एक्स्प्लोर

Nashik : प्रख्यात बिल्डर असल्याचे भासवत तब्बल सव्वातीन कोटी उकळले, नाशिकमधील प्रकार, बिल्डर फरार

Nashik Crime News : कमी रकमेत फ्लॅट देतो, असे आमिष दाखवून सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करून फरार झाल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : गुंतवणूकदारांना (Investors) मोठमोठी प्रलोभने देऊन कमी रकमेत फ्लॅट (Flat) देतो, असे आमिष दाखवून सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करून फरार झाल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध (Builder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी कुणाल प्रकाश घायाळ (पाईपलाईन रोड, गंगापूररोड) व इतर संबंधित यांनी दि. 19 ऑगस्ट 2013 ते 2021 या कालावधीत मौर्या होईट्स या नावाने ध्रुवनगर, शिवाजीनगर येथे इमारतीच्या बांधकामाची साईट सुरु केली होती. आरोपींनी फिर्यादी अमोल भरत भागवत (29, रा. उत्तमनगर, सिडको) यांना या इमारतीचे दस्तऐवज विविध गुंतवणुकदारांना संबंधित विभागात लिहून दिले. 

कमी रकमेत फ्लॅट देण्याचे दाखवले आमिष

तसेच के. के. डेव्हलपर्स व अंश प्रॉपर्टीज्, विसे मळा, कॉलेजरोड येथे स्वतःचे मोठे ऑफिस असल्याचा देखावा निर्माण करुन त्याचप्रमाणे फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना मोठमोठी आश्वासने देऊन कमी रकमेत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून मौर्या हाईट्स या इमारतीबाबत जाहिरात पत्रक तयार केले. त्यामध्ये वन बिएचके फर्निश फ्लॅट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जी.एस.टी., लिगल फी सर्व खर्चासहीत फ्री अलॉटेड पार्किंग, फ्री मॉड्युलर किचन ट्रॉली, एलईडी टी.व्ही., फ्रिझ आदी सुविधांसह उत्तम दर्जेदार बांधकाम, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2 लाख 67 हजार रुपयांची सबसीडी आणि रेरा अॅप्रुव्हर्ड अशी जाहिरात दिली.

3 कोटी 26 लाख उकळले

फिर्यादी भागवत यांच्याकडून 11 लाख 70 हजार रुपये स्वीकारले. तसेच इतर गुंतवणूकदार यांच्याकडूनही वेगवेगळ्या प्रकारे अंदाजे 3 कोटी 26 लाख रुपयांच्या रकमा स्वीकारल्या. त्याबदल्यात बिल्डर कुणाल घायाळ याने मौर्या हाईट्स या इमारतीमधील 24 फ्लॅटच्या गुंतवणूकदारांना करारनामा, साठेखत, नोटरी, जनरल मुखत्यारपत्र असे वेगवेगळे दस्तऐवज लिहून व नोंदवून दिले होते. तसेच त्यांच्याकडून फ्लॅटच्या मोबदल्यापोटी ठेवी रकमा स्वीकारुन इमारतीचे बांधकाम अपूर्ण ठेवले. 

रक्कम परत न करताच आरोपी फरार

तसेच मुदतीत देता त्यांच्याकडून स्वीकारलेल्या ठेवींच्या रकमेची अफरातफर केली. फिर्यादीकडून व इतर गुंतवणूकदारांकडून रक्कम परत न करता आरोपी कुणाल घायाळ हा फरार झाला असून, त्याने सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांचा परतावा न देता आर्थिक फसवणूक केली म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहे.

आणखी वाचा 

धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दीड वर्षाच्या बाळासह शेततळ्यात उडी, निफाडमधील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोषABP Majha Headlines :  8:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सT 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशनTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
Embed widget