Dombivli Crime : डोंबिवलीत एकतर्फी प्रेमासाठी अल्पवयीन मुलीची छेडछाड,19 वर्षीय आरोपी अटकेत
Dombivli Crime : डोंबिवलीत एकतर्फी प्रेमासाठी अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्या प्रकरणी संबंधित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलं आहे.

ठाणे : साताऱ्यातील 18 वर्षांच्या युवकानं नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याची घटना ताजी असतानाच ठाण्याजवळील डोंबिवलीमध्ये देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. डोंबिवलीत देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी देत तिला प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करुन संबंधित युवकाला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी देत तिला प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे.मुलगी कॉलेजला जात असताना आरोपी रमेश राठोड तिचा पाठलाग करत होता. तो तिला वारंवार प्रेमाला हो म्हणं असं बोलत होता. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर त्याने मुलीची छेडछाड करत स्वतःच्या हाताची नस कापण्याची धमकी दिली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रमेश राठोडला अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे या गुन्ह्याच्या घटनेबद्दल माहिती दिली आहे. आरोपी रमेश राठोड यानं फिर्यादीच्या मुलीचा गेल्या चार पाच महिन्यापासून पाठलाग करत होता. पाठलाग करुन रिलेशनशिप करण्यास सांगत होता. रिलेशनशिप न केल्यास हाताची नस कापून घेईन असं सांगत होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं सुहास हेमाडे यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.






















