एक्स्प्लोर

Dhule : दोन मोठ्या कारवाईत धुळे पोलिसांनी हस्तगत केला तब्बल 30 लाखांचा गुटखा

Dhule Crime : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत धुळ्यामध्ये 30 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. 

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेने सध्या धुळ्यातील (Dhule Crime) गुटखा माफियांच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचत 27 लाख रुपयांची गुटखा तस्करी रोखली, तर धुळे शहरातील देवपूर भागातून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत धुळे पोलिसांनी एकूण तब्बल 30 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई 

शिरपूरकडून धुळे मार्गे औरंगाबादकडे एक ट्रक महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला (Dhule Crime Branch) मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास चाळीसगाव रोड चौफुली वरील एका हॉटेलजवळ सापळा रचला. त्यावेळेस पोलिसांना ज्या ट्रकवर संशय होता, त्या ट्रकला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रक ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला वाहन थांबून आपल्या एका साथीदारासह अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. सदर वाहनाची तपासणी केली असता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पान मसाला आढळून आला. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत तीन लाखांचा गुटखा जप्त 

दुसऱ्या एका कारवाईत धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील एक इसम आपल्या एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये लाखो रुपयांचा गुटखा ठेऊन आहे याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संशयित असलेला सलमान खान याच्या घराजवळच्या शेडची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Kolhapur : फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Embed widget