सामाजिक कार्य का करतो? म्हणत बाप- लेकाकडून कोयत्याने वार, जागीच मृत्यू; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे एक धक्कादायक घटना घडली असून नळदुर्ग जवळच्या शिवराज हॉटेल अँड बार समोर सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे याची बाप लेकाने मिळून हत्या केल्याची घटना समोर आली

Dharashiv Crime: धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्य का करतो? म्हणत बापलेकाने कोयत्याने हल्ला करत एकाची निर्घृण हत्या केली आहे . नळदुर्ग येथील एका हॉटेल समोर हत्तीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे . या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे .
सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे .सामाजिक कार्य का करतो असे विचारत दोन्ही आरोपींनी सूर्यकांत सुरवसे यांची हत्या केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये दिली आहे .यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगा सोहन गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे .तर वडील जयकुमार गायकवाड फरार आहे .नळदुर्गच्या शिवराज हॉटेल अँड बार समोर हा सगळा प्रकार घडला .
नेमकं घडलं काय?
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे एक धक्कादायक घटना घडली असून नळदुर्ग जवळच्या शिवराज हॉटेल अँड बार समोर सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे याची बाप लेकाने मिळून हत्या केल्याची घटना समोर आली .या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे .याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात जयकुमार गायकवाड आणि त्यांचा मुलगा सोहन गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत सुरवसे याला सामाजिक कार्य का करतो असे म्हणत बापलेकाने कोयत्याने हल्ला करत संपवले,अशी तक्रार मृत सूर्यकांत सुरवसे च्या पत्नीने केली आहे.
या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे मागणी केली आहे.यापैकी मुलगा सोहन गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वडील जयकुमार गायकवाड फरार आहे .नळदुर्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत .या घटनेचा अधिक तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .
'ती' मदतीसाठी याचना करत राहिली, पण
नाशिकमधील इंदिरानगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवेलगत असेल्या बोगद्याजवळ एका जोडप्याला दोन तरूण मारहाण (Crime News) करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदिरानगर बोगदा ते दीपाली नगर दरम्यानच्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला झाडीत बसून दारू पिणाऱ्या काही बेवड्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रीणीलाही या दारुड्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
हेही वाचा























