Dharashiv Crime: शाळेतील सहशिक्षेकेवर अत्याचार, प्राचार्यानं घातलं शिक्षकाला पाठीशी? पालक आक्रमक
DHarashiv Crimeआरोपी शिक्षकाविरोधात दीड वर्षांपूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
Dharashiv Crime: धाराशिव शहरात अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.शाळेतील शिक्षकाकडून सहशिक्षकेवर आमिष दाखवत अत्याचार केल्याची घटना घडली. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले. पालकांनी शाळेच्या गेट समोर ठिय्या आंदोलन घालत गोंधळ घातला. या घटनेत केवळ शिक्षक जबाबदार नसून प्राचार्यदेखील जबाबदार असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केलीय.
संबधीत शिक्षकाविरोधात दीड वर्षापर्वीच तक्रार केली होती. मात्र कारवाई झाली नाही. कारवाई झाली असती तर असा प्रकार घडला नसता असं पालक म्हणाले. प्राचार्यांवर तात्काळ कार्यवाही करावी तसेच शाळेतील शिक्षणाचा दर्जा घटला आहे. त्यामुळे शिक्षणपद्धतीत बदल करावे या मागणीसाठी पालकांनी आंदोलन केलं. शाळा प्रशासन मात्र या आंदोलनावर बोलण्यास तयार नसल्याने अधिकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नक्की झालं काय?
धाराशिव शहरातील एका शाळेत एका शिक्षकाने सहशिक्षकेला आमिष दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र या गंभीर घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत.
घटनेनंतर शाळेच्या गेटसमोर संतप्त पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांनी गोंधळ घालत संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पालकांनी केवळ आरोपी शिक्षकच नव्हे, तर शाळेच्या प्राचार्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शिक्षकाविरोधात दीड वर्षांपूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. जर त्या वेळी योग्य कारवाई झाली असती, तर अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळता आली असती, असे पालकांचे मत आहे. या आरोपानंतर तर्कवितर्कांना उधाण आलंय. प्रायार्चानेच शिक्षकाला पाठीशी घातल्याची चर्चा सुरु आहे.
शाळा प्रशासनाने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत भाष्य करण्यास नकार दिल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे.शाळा प्रशासनाच्या शांततेच्या भूमिकेमुळे पालकांच्या रोषाला अधिक बळ मिळाले आहे. यामुळे शाळेसमोर वातावरण तणावपूर्ण बनले असून, या प्रकरणावर वेगाने आणि कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: