एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Nashik Crime: नाशिकमधील नामांकित कंपनीत जिहादी रॅकेटचा संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra Fadnavis on Nashik Crime: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Devendra Fadnavis on Nashik Crime: नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण अत्यंत 'धक्कादायक आणि गंभीर' असल्याचे म्हटले आहे. यामागे एखादे संघटित 'जिहादी रॅकेट' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

Devendra Fadnavis on Nashik Crime: काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलेले आहे. एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये अशा प्रकारे दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांचे कौतुक करेन की त्यांनी अतिशय वेगाने कारवाई करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे."

Nashik Crime News: काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणींना लक्ष्य करून एक मोठे षडयंत्र रचले गेल्याचा संशय आहे. बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना कंपनीत भरती केले जात असे. त्यानंतर 'टीम लीडर्स' आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करून आणि एका विशिष्ट धर्माची श्रेष्ठता पटवून देऊन तरुणींचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात होता. पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. एका पीडितेच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी गोपनीय तपास केला आणि हे मोठे रॅकेट उघड झाले. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Nashik Crime News: पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

नाशिक पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी स्थानिक असले, तरी त्यांचे धागेदोरे एखाद्या बाहेरील कट्टरपंथी संघटनेशी जोडलेले आहेत का? याचा तपास सध्या सुरू आहे.

Nashik Crime News: एसआयटीची स्थापना

या प्रकरणी 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी पथकात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबई नाक्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे, जितेंद्र वाघ, उमेश बोरसे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास माळी, किरण शेवाळे, मिताली कोळी, अंमलदार संदीप बागल यांचा समावेश आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: नकली साप, वाघ, गर्भवती महिलेवर अत्याचार...युक्तिवादानंतर न्यायाधीशांचा आरोपीला एकच प्रश्न, अशोक खरात म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget