(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वसईत ट्रॅव्हल बॅगेत आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचा छडा लागला, गुजरातमधून दोन आरोपी ताब्यात
Vasai Crime News : वसईत ट्रॅव्हल बॅगेत आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचा छडा लागला असून गुजरातमधून दोन आरोपी ताब्यात
Vasai Crime News : अंधेरीला (Andheri) राहणाऱ्या तरुणीला ठार मारुन तिचा मृतदेह वसईच्या (Vasai) नायगांव खाडी किनारी एका ट्रॅव्हल बॅगेत टाकणाऱ्या दोघां आरोपींना अखेर वाळीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण टिमने गुजरात येथून अटक केली आहे.
शुक्रवार मुंबई हादरली, ती बॅगेत आढळलेल्या एका मृतदेहामुळे. नायगावच्या खाडीच्या किनाऱ्यावर एका मुलीचा मृतदेह ट्रॅवल बॅगेत आढळून आला होता. या प्रकरणी वाळीव पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची अनेक पथकं तपास करत होती. वालीव पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींचे फोटोही जारी केले होते. अखेर वालीव पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण शाखेनं गुजरातच्या पालनपूर शहरातून दोन आरोपीने पकडलं आहे. आरोपी संतोष मखवाना (21 वर्ष) आणि विशाल अनभवणे (21 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. दोघंही मुंबईचे रहिवाशी आहेत.
काय घडली होती घटना?
25 ऑगस्ट रोजी मुलगी शाळेत जाण्यासाठी म्हणून घराबाहेर निघाली. विलेपार्ले येथे या मुलीची शाळा होती. दुपारी अंदाजे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील तिच्या राहत्या घरातून मुलगी निघाली होती. पण त्यानंतर ती शाळेत पोहोचलीच नाही. तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. घरतच्यांनी तिचा शोध घेतला पण तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.
26 ऑगस्ट रोजी पोलिसांना नायगाव खाडी किनारी एका ट्रॅव्हल बॅगेत मृतदेह आढळून आला. ही बॅग नायगाव खाडीलगत असणाऱ्या झाडीत टाकण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. दोन आरोपींचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली.
पोलीस चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्टला मयत मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. विलेपार्ले येथील शाळेत जाण्यासाठी मुलगी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास अंधेरीमधील तिच्या घरातून निघाली. तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. मयत तरुणीला आरोपी विशाल अनभवणेने तिच्या जुहू येथील घराच्या वरती नेऊन तिची हत्या केली. आरोपीनं तिच्यावर चाकूनं वार करुन हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅगेत भरुन, नायगावच्या झाडीत टाकला होता. ही घटना 25 ऑगस्टला घडली होती. त्यानंतर हे दोघेही फरार होते. त्यानंतर 26 ऑगस्टला तिचा मृतदेह नायगांवच्या झाडीत आढळला होता. या प्रकरणी वाळीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आणि दोन आरोपींचा शोध सुरु केला होता.