मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बँक खात्यावर आता सायबर भामट्यांचा डोळा असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या बँक खात्यातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला असून आता कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या बँक खात्यावर सायबर चोरांचं लक्ष आहे. अशाच एका खळबळजनक प्रकरणाचा मुंबई क्राईम ब्रँचला छडा लावण्यात यश आले आहे. अरलेब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रभाव प्रॉपर्टीज लिमिटेड या नामांकित कंपन्यांनीच्या मालकाचा मृत्यू 20 जून रोजी कोरोनामुळे झाला. या दोन कंपन्यांच्या बँक खात्याची माहिती आणि त्या कंपनीच्या मालकाची माहिती मिळवून चौघेजण त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ट्रांजेक्शनद्वारे रक्कम चोरणार होते. ज्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांच युनिट 11 चे पोलीस निरीक्षक चिमाजी आढावा यांना मिळाली. त्यांनी या संदर्भातली माहिती वरिष्ठांना कळवताच वरिष्ठांनी त्यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. आपली टीम घेऊन आढाव तयार झाले आणि त्यांच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी ट्रांजेक्शनला सुरुवात केलीच होती की, तेवढ्यात मुंबई क्राईम ब्रँच युनिट 11 ने त्यांना 25 जुलैला दहिसरमधील एका झोपडपट्टीमधून अटक केली. कंपनीचे महत्त्वाचे कागदपत्र चेक बुक आणि डॉक्यूमेंट गहाळ झाल्याची तक्रार कंपनीचे मॅनेजर ने जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
सायबर भामटे नवीन नवीन शोध लावून लोकांना फसवण्याचा मार्ग शोधून काढत आहेत. याच अनुषंगाने याचा उघडणे ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी सर्व तयारी केली होती.
नेमकी कशी आणि काय तयारी केली होती?
या चौघांनी मयत इसमाच्या नावे एक फेक सिमकार्ड घेतले होते.
मोबाईलमध्ये आणि इतर ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट ॲप डाऊनलोड केले होते. गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन ॲप डाऊनलोड केले होते.
त्या मोबाईलमध्ये ट्रांजेक्शन करण्यासाठी लागणारा वन टाइम पासवर्ड देखील आला होता.
मृत व्यक्तीचे बँकेशी लिंक असलेल्या राजिस्टरड नंबरचा डुपलीकेट सिम मिळवण्यासाठी मृत व्यक्तीचे डुबलीकेट आधार कार्ड बनवून त्याच नंबरचे सिम मिळवले होते.
ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी महत्त्वाचा असलेला वन टाइम पासवर्ड देखील त्यांच्या मोबाईलमध्ये आला होता आणि गुगल पे आणि पेटीएम माध्यमाने बँकेतील रक्कम अफरातफर
करण्याची पूर्ण तयारी जवळपास झाली होती.
मात्र क्राईम ब्रांचच्या दक्षतेमुळे हे चौघे यशस्वी होऊ शकले नाहीत. सदर प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही ठाण्यात राहणारे होते.
अटक केलेल्या आरपीनची नाव :
1) शाफिक मेहबूब शेख
2) प्रितेश उर्फ पिंटू बीपीनचंद्र मांडलिया
3) अरशद सैयद
4) स्वप्नील ओगलेकर
अटक आरोपींपैकी एक आरोपी मृत व्यक्तीच्या कंपनीमध्ये कामाला होता. तर दुसरा आरोपीने स्वतःचा फोटो डुप्लिकेट नंबर घेण्यासाठी आधार कार्डवर वापरला होता. तिसरा आरोपी हा विविध बँकांमध्ये कामाला होता. तसेच त्याने परदेशातही काम केले होते. लॉकडाऊनमुळे तो भारतात परतला होता. ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या सर्व्हर आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार होता. जेणेकरून हा फ्रॉड परदेशातून केला गेला आहे, असं भासविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मात्र क्राइम ब्रांचच्या समय सुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसाच्या घरी चोरी, तक्रारीनंतर पोलिस म्हणतात, 'ते' घर सॅनिटाईझ नसल्यानं तपासाला जाणार नाही!
नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीमुळे प्रकार उघड