Crime News : अनैतिक संबंधात अडसर, सूड उगविण्यासाठी तरुणाच्या रिक्षात ठेवला गावठी कट्टा, अन् पुढे घडलं असं काही...
Crime News : रिक्षात गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Crime News : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्याचा सूड उगविण्यासाठी मध्यरात्री तरुणाच्या रिक्षात गावठी कट्टा ठेवून त्याला अडकविणाऱ्या नितीन वसंत तायडे (25, रा. कुसुंबा) व ऋषीकेश उर्फ बंटी बापू चित्ते (20, रा. वाघेश्वरी माता मंदिराजवळ, कुसुंबा) या दोघांचा शनिपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुल दिली. त्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव शहरातील नेरी नाका परिसरातील रिक्षात गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या राहुल रंगराव पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी करीत असताना, त्याच्या पत्नीचे गावात राहणाऱ्या नितीन तायडे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुल पाटील याला होता.
सूड उगविण्यासाठी तरुणाच्या रिक्षात ठेवला गावठी कट्टा
त्यावरुन त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. त्यामुळे राहुलवरील सुड उगविण्यासाठी त्याला गावठी कट्टा बाळण्याच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी नितीन तायडे याने प्लॅन तयार केला होता. नितीन तायडे याने सांगितल्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास ऋषीकेश याने रिक्षाच्या सीटखाली असलेल्या बॉक्समध्ये पिस्टल लपवून त्याची माहिती एका हॉटेल चालकापर्यंत पोहोचवली.
दोन जण पोलिसांच्या ताब्यात
त्या हॉटेल चालकाने पोलीस असलेल्या त्याच्या मित्राला ही माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर राहुल पाटील याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साजीद मंसुरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोना किरण वानखेडे, विकी इंगळे, रविंद्र साबळे यांच्या पथकाने संशयित नितीन तायडे व ऋषीकेश उर्फ बंटी चित्ते याला अटक केली आहे.
मालमत्तेच्या वादावरून महिलेचा विनयभंग
दरम्यान, मालमत्तेच्या वादावरून जेठ व पुतण्याने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व सासूला मारहाण शिवीगाळ केल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा येथील सिद्धार्थ चौकात घडली. पीडित महिलेने फिर्याद दिली की, तिचा जेठ जय इतवारी चव्हाण आणि पुतण्या बाबा उर्फ गगन जय चव्हाण हे मालमत्तेच्या वादासाठी घरात मागच्या बाजूने आले आणि तिची सासूला शिवीगाळ व धक्काबुक्की करायला लागले. त्यावेळी महिलेचे पती त्यांना समजावण्यास गेले असता त्यांनी महिलेच्या पतीला चापट बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. महिला भांडण आवरायला गेली तेव्हा जेठ जय याने तिचा विनयभंग केला.
आणखी वाचा





















