Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; आतापर्यंत 10 माओवाद्यांना कंठस्थान
Naxal Attack : छत्तीसगढ राज्यातील नक्षल्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाड मध्ये पोलीस आणि नक्षल्यामध्ये मोठी चकमक झालीय. या चकमकीत सुरक्षा दलानी आतापर्यंत 10 माओवाद्यांचा खात्मा केलाय.
Naxal Attack गडचिरोली : छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्यातील नक्षल्यांचा (Naxal) गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाड मध्ये पोलीस आणि नक्षल्यामध्ये मोठी चकमक झालीय. या चकमकीत सुरक्षा दलानी आतापर्यंत 10 माओवाद्यांचा खात्मा (Naxal Attack) केल्याची माहिती हाती आलीय. बारच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर परिसरात शोध घेत असताना 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी 3 महिलांसह एकूण 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. तर, चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
10 माओवाद्यांना कंठस्थान
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवायांच्या तयारीत असलेल्या नक्षल्यांच्या तुकडीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी अचानक हल्ला केला. यामुळे त्यांचा डाव उधळून लावण्यात जवानांना यश आले आहे.
या चकमकीत नक्षलवाद्यांचे सीसी सदस्य आणि डीव्हीसी सदस्य ठार झाल्याची माहितीही हाती आली आहे. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोटके, राशन, कॉम्प्युटर, औषधीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना या शोध मोहिमेत जंगलात लपवलेली एक जेसीबी मशीन देखील आढळून आली आहे. या जेसीबीचा उपयोग जमीन खोदून बंकर बनविण्यासाठी नक्षलवादी वापर करत असतात.
गेल्या 5 तासांपासून ही चकमक
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अचानक हल्ल करत नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावलाय. ही कारवाई डीआरजी आणि एसटीएफच्या तुकडीच्या संयुक्त दलने केली आहे. तर टेकमेटा आणि काकूर गावादरम्यानच्या जंगलात पोलीस दल आणि माओवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरू असल्याचीही माहिती पुढे आली आहे. गेल्या 5 तासांपासून ही चकमक सुर असल्याचे बोलले जात आहे. प्रथमिक माहितीनुसार छोटेबैठिया पोलीस स्टेशनच्या टेकामेटाच्या जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. तर आता या परिसरात आणखी बॅकअप पार्टी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या