उचभ्रु सोसायटीतून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, पंटरसोबत सापळा रचला, फोन वाजला अन्… छत्रपती संभाजीनगरमधला प्रकार
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंटी मिनाज बेग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नंदनवन कॉलनीतील विठ्ठल विशाखा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये गुप्तपणे चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा छावणी पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विशेष सापळा रचून कारवाई केली. या छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली, तर व्यवसाय चालवणाऱ्या आंटी मिनाज उस्मान बेग (वय 45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं घडलं काय?
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदनवन कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची तक्रार मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक नागवे आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह विशेष टीम तयार करण्यात आली. कारवाईसाठी नकली गिर्हाईकाला घटनास्थळी सोडण्यात आले. व्यवसायातील आंटी मिनाज बेगने 2,000 रुपये खर्च निश्चित करून सौदा केला. ठरल्याप्रमाणे महिला फ्लॅटमध्ये पाठविल्यानंतर मिस कॉल देत छाप्याची माहिती पोलीस पथकाला दिली. यानंतर पथकाने ताबडतोब फ्लॅटवर धाड टाकली आणि एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी हमालदार जालिंदर मांटे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंटी मिनाज बेग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आली आहे. उच्चभ्रू सोसायटीत चालणाऱ्या या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस नियमितपणे गुप्त कारवाई करत आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनेक महिला अशा जाळ्यातून सुटल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये धक्क्याची भावना आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना असं म्हणत मदत मागितली की, कुठल्याही संशयास्पद घटनांची तक्रार तत्काळ पोलिसांना करावी, ज्यामुळे अशा गुन्ह्यांवर लवकर कारवाई करता येईल.























