एक्स्प्लोर

खूप वेळ घरी परतले नाहीत, शोध घेतला तेंव्हा दिसला लटकलेल्या अवस्थेत, संभाजीनगरात अल्पभूधारक शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

Chhatrapati Sambhajinagar Crime:  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठा नुकसान झाला आहे. आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या उघडकीस येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. आत्महत्या निराशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

नेमकी घटना काय?

सुरेश मुळे हे वरुड काजी येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबात आई आणि दोन मुले आहेत. त्यांना दोन एकर शेती असून, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी सुरेश बराच वेळ घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, परंतु सुरेश मुळे सापडले नाहीत. काही वेळानंतर गावकऱ्यांना माहिती मिळाली की सुरेश मुळे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. घटना उघडकीस आल्यावर गावात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आर्थिक ताण आणि मानसिक नैराश्यामुळे ही आत्महत्या झाल्याचे दिसते, मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

अतिवृष्टीनं बळीराजा उध्वस्त

महाराष्ट्रच्या मराठवाडा व कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस जिल्ह्यांना झोडपून काढत आहे. सोलापूर, बीड, हिंगोली आणि लातूरमध्ये शेतकरी, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय.  नदीकाठच्या गावांत शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, पूल उध्वस्त झाले आणि विद्युत पोल आडवे झाले. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. बीडमध्ये जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी 20 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी भरलंय. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Buldhana Crime News: देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
Harmanpreet Kaur News : वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस

Embed widget