माझा भाऊ डॉन, तो डायरेक्ट मर्डर करतो; वाळुजमध्ये मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा, नागरिकांना उघड धमकी
Chhatrapati Sambhaji Nagar Video : पोलिस आपलं काहीही करू शकत नाहीत असं म्हणत त्या मद्यधुंद तरुणींनी जमलेल्या लोकांनाच धमकी दिल्याचं दिसून आलं.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या वाळुजमधील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. तसेच त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनाही शिवीगाळ केल्याचं समोर आलं. 'आपला भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो' अशी उघड धमकी त्या मुलींनी दिली. तसेच पोलिस आपले काहीही करू शकणार नाही असंही एक तरुणी म्हणतेय. या संबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वाळुजमधील महाविर चौकामध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली. दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घातला. तसेच रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या दोघींनी शिवीगाळ करत त्रास दिला.
पोलिस काहीही करू शकणार नाहीत
'आम्हाला पोलिस काहीही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत. टेन्शनमुळे दारू प्यायली आहे' असं त्या दोघी म्हणताना दिसत आहे. तसेच माझा भाऊ हा डॉन आहे. तो हाफ नाही तर डायरेक्ट फुल मर्डर करतो असं म्हणत त्यातील एका तरुणीने जमलेल्या लोकांना धमकीही दिली.
या दोन्ही तरुणींना जमलेल्या नागरिकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूर कायम ठेवला. नंतर त्या तरुणींना रस्त्यावरून धड चालताही येत नव्हतं. त्यामुळे पुढे जाऊन त्या रस्त्याच्या कडेला बसल्या. घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले .
ही बातमी वाचा:

























