धक्कादायक! आयफोनसाठी वीस वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आयफोन मिळत नसल्याच्या रागातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : मागील काही दिवसांत तरुणांमध्ये महागड्या मोबाइलचे मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आयफोनची (iPhone) अधिकच क्रेज तरुणांमध्ये आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील एका वीस वर्षीय तरुणाने चक्क आयफोनसाठी आत्महत्या (Suicide) सारखं टोकाचे पाऊल उचलले आहेत.आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आयफोन मिळत नसल्याच्या रागातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिकेत प्रल्हाद म्हस्के (वय 20 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "अनिकेत आपल्या आई, वडील व लहान भावासह नागसेननगरमध्ये राहतो. दरम्यान, शनिवारी रात्री त्याचा लहान भाऊ परिसरातच मामाकडे गेला आणि रात्री देखील तिथेच झोपी गेला. तसेच, आई-वडील देखील कामावर गेल्याने अनिकेत घरी एकटाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मामाकडे गेलेला लहान भाऊ घरी परतला. त्याने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घरात डोकावून पाहिले असता अनिकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला.
आयफोनसाठी हट्ट करत होता
अनिकेतचे मित्र व नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नुकताच बारावी उत्तीर्ण झालेल अनिकेत पदवीच्या प्रथम वर्षाल शिकत होता. वडील साखर कारखान्याच्या ट्रकवर चालक असून आई खासगी रुग्णालयात नर्स आहे. तर, अनिकेत मागील काही दिवसांपासून आयफोनसाठी हट्ट करत होता. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडा मोबाइल घेणे शक्य नव्हते. याबाबत घरच्यांनी त्याला अनेकदा समजावूनही सांगितले होते. त्याच नाराजीतूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा बंद मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ट्रॅक्टरचालकाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत ट्रॅक्टरचालक युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील केसापूरी येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लक्ष्मण देविदास वाहूळ (वय 34 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्याने चुलतभावाच्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. सोमवारी सकाळी लक्ष्मण यास झोपतून उठविण्यासाठी त्याचा भाऊ खोलीत गेला असता हा पक्रार उघडकीस आला. सदर माहिती दौलताबाद पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीचे लक्ष्मण यास खाली उतरून मोबाईल व्हॅनने घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kota News : सॉरी, मम्मी-पप्पा, मी...; परीक्षेच्या एक दिवसआधीच विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य