बुलढाणा हादरलं ! ब्रेकअपनंतर तरुणीचा नवा बॉयफ्रेंड बघून एक्स बॉयफ्रेंड बिथरला, प्रेम प्रकरणाला भयानक वळण
Buldhana Crime: न्यायालयाने चौघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .घटनेचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत .

Buldhana Crime: ब्रेकअप नंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसराच कोणीतरी आला हे सहन न करू शकलेल्या एक्स बॉयफ्रेंडने भरदिवसा हत्या केल्याचं समोर आलं असून बुलढाण्यात प्रेम प्रकरणाला भयानक वळण लागलं आहे . . प्रेम प्रकरणातून 6 जणांनी मिळून एकाची भर दिवसा हत्या केल्याचं उघड झालं आहे . या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे . बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चौघांना अटक केली आहे . (Buldhana Crime)
सनी सुरेश जाधव असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे .एकाच मुलीवर दोघांच्या प्रेम प्रकरणातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे .
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑगस्ट च्या संध्याकाळी बुलढाण्यात ही धक्कादायक घटना घडली .शहरातील ड्रीम कॉस्मेटिक दुकानाच्या बाजूला असणाऱ्या इमारतीच्या ठिकाणी 19 वर्षीय सनी जाधव या तरुणावर देवराज माळीसह इतर 4 ते 5 जणांनी हल्ला चढवला . तरुणाला निर्घृणपणे संपवलं .पोटात व छातीत चाकू खूपसल्याने तरुणाच्या जागीच मृत्यू झाला .तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याच पाहून देवराज व त्याचे इतर साथीदार घटनास्थळावरून फरार झाले .
ब्रेकअपनंतर तरुणीचा दुसरा बॉयफ्रेंड पाहून बिथरला अन् ..
देवराज माळी याचे एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होते .काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेक-अप झालं .ब्रेकअपनंतर तरुणीचे सनी जाधव याच्याशी सुत जुळल्याच कळताच तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड देवराज माळी बिथरला .त्याने सनी जाधवला दूर राहण्यास सांगितले .मारहाण करणार असल्याची धमकी ही दिली .शेवटी बुलढाणा शहरातील भीलवाडा परिसरात देवराज माळी व त्याच्या साथीदारांनी सनी जाधवची हत्या केली . सनी जाधव च्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला .व नंतर काही तासातच देवराज माळीसह 4 जणांना अटक केली .या चौघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं .न्यायालयाने चौघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .घटनेचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत .























