एक्स्प्लोर

आमदार गणपत गायकवाडांसह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ganpat Gaikwad Firing Case :  शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ganpat Gaikwad Firing Case :  शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill Line Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आज, 14 फेब्रुवारी पोलीस कोठडी संपली. आज त्यांना न्यायालयात हजर केले. गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींचा   एमसीआर काढण्यात आला. कोर्टाने गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवली आहे. 

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

बुधवारी सकाळी पोलिसांनी गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना उल्हासनगर चोपडा कोर्टात  हजर केले. त्यावेळी न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायाधीशांनाही पहाटेच न्यायालयामध्ये आणून ठेवण्यात आले होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते.   सरकारी वकिलांनी गणपत गायकवाड यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्याला गणपत गायकवाड यांनी विरोध केला. दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपींना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर व रणजित यादव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? घटना सीसीटिव्हीत कैद

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा सर्व थरार पोलिस स्टेशनच्या सीसीटिव्हीत कैद झाला. घडलेला प्रकार असा की, आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड उल्हासनगर येथील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात आले. तसंच शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील देखील तिथं आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी वैभव यांनी पुन्हा आमदारांशी फोनवरून संपर्क साधत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड गायकवाड देखील 'हिललाइन' पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाडसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार गायकवाड पोलीस ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये गेले. त्या केबिनमध्ये आगोदरच महेश गायकवाडसह त्यांचा साथीदार राहुल पाटील उपस्थित होते.तिघं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिनमध्ये चर्चा करत असताना पुन्हा गणपत गायकवाड यांची महेश पाटील यांच्यात वाद झाले. अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बंदुकीतून महेश गायकवाडसह राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानतंर त्यांच्या खासगी अंगरक्षकानं त्यांच्याजवळील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEORaj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEOABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Embed widget