एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : पत्नीवर धारदार शस्त्राने वार, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हल्ला

पतीने पत्नीवर धारधार शस्त्राने केले वारवादानंतर रागाच्या भरात हल्ला केल्याचा अंदाजमहिलेवर रुग्णालयात उपचार सुरू, पतीला अटक

भिवंडी : पतीने  धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले आणि तिला बेदम मारहाण केली.   पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हा प्रकार केला. भिंवडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद रियाजुद्दीन (वय 53 वर्ष) असे  हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे तर नूर जहान (वय 44 वर्ष) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद रियाजुद्दीन व त्याची पत्नी नूरजहा यांच्यात वाद सुरू होते. पती रियाजुद्दीन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत. याच कारणामुळे पती रियाजुद्दीन हा आपल्या पत्नीपासून वेगळा राहत होता. नूरजहा आपल्या मुलांसह भिवंडी येथील गैबी नगर या परिसरात राहत होती. मात्र रियाजुद्दीन याचा संशय काही कमी झाला नाही आणि त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे. या भांडणाला कंटाळून पत्नीने पतीला घरात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे पती रियाजुद्दीन खूपच चिडला होता.

रागाच्या भरात त्याने नूरजहा घरात एकटी असताना घरात प्रवेश करून घरातच तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात नूरजहा गंभीर जखमी झाली. रियाजुद्दीनने जवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावली. ज्यामुळे पत्नीच्या मदतीसाठी कोणी येऊ नये. अखेर खिडकीमधून बाहेर आवाज दिल्यानंतर रस्त्यावरील काही नागरिक तिच्या मदतीसाठी आले.  पती रियाजुद्दीन याला   स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देखील दिले.

रक्ताचा थारोळ्यात पडलेली पत्नी नूरजहाला तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिची परिस्थिती अतिशय गंभीर असल्या कारणाने तिला कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कळव्यात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची परिस्थिती चिंताजनक असून शांतिनगर पोलिसांनी पती रियाजुद्दीन याला अटक केली आहे.  या संपूर्ण प्रकरणात पतीविरोधात 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून शांतीनगर पोलीस या  घटनेचा तपास करीत आहेत. 

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech : औरंगजेबची कबर दिसली पाहिजे,  राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी ABP MAJHAChhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणRaj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या प्रांतावर झालेला संस्कार ABP MAJHARaj Thackeray on Aurangzeb : प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं असं राज यांचं औरंगजेब प्रकरणावर भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Embed widget