Bhiwandi Crime : तबेल्यात घुसून सपासप वार करत जनावरांची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या
Bhiwandi Crime News : दोन माणसांच्या आर्थिक व्यवहारांचा फटका मुक्या जीवांना बसला. भांडणामुळं मुक्या जनावरांना बळी पडावं लागल्याची घटना समोर आली आहे.
Bhiwandi Crime : भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला भागात असलेल्या म्हशींच्या तबेल्यातील म्हशी आणि रेड्यांवर प्राणघातक हल्ला करून कत्तल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात निजामपुरा पोलिसांना यश मिळाले आहे. फाजिल हुसेन रफिक अहमद कुरेशी वय 20 वर्षे, रा .कसाई वाडा, कुरेशी नगर, भिवंडी असे जनावरांची कत्तल केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे फाजील हा फिर्यादी अरहम यांच्या ओळखीचा देखील असून त्यानेच हे कुकर्म केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तबेला सुरू करताना अरहम साजीद मोमीन यास जनावरे खरेदी करून देताना आरोपी फाजिल हुसेन रफिक अहमद कुरेशी याने किमान दहा ते बारा लाख रुपयांचा फायदा करून दिला होता. त्यातून तो तबेला मालकाकडे पैशांची मागणी करत होता. ते देण्यास तबेला मालकाने नकार दिल्याने त्या रागातून आरोप फाजिल हुसेन रफिक अहमद कुरेशी याने खरेदी करून दिलेली जनावरांना नुकसान देण्याच्या उद्देशाने हल्ला केला. तबेल्यात घुसुन सुऱ्यानं जनावरांवर सपासप वार केला. यात 7 जनावरांची हत्या तर 13 जनावरांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजार केले असता 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.
दोन माणसांच्या आर्थिक व्यवहारांचा फटका मुक्या जीवांना बसला. भांडणामुळं मुक्या जनावरांना बळी पडावं लागल्याची घटना समजताच परिसरात खळबळ उडाली होती.
15 मे रोजी भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला येथील अरहम मोमिन यांच्या तबेल्यात ही घटना घडली होती. तब्बल 22 म्हशी आणि रेड्यांवर सुऱ्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यापैकी 7 म्हशींचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तबेला मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. याबाबत अरहम मोमीन यांच्या तक्रारीवरुन निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
भिवंडीत 11.66 कोटींचा जमीन घोटाळा; नायब तहसीलदार फरार, 17 आरोपींना अटक, भाजप नेत्याचाही सहभाग