एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : कर्ज रिकव्हरी एजंट बनले चोर, मुंबई-ठाणे परिसरातून 18 रिक्षा चोरणाऱ्या चौकडीस भिवंडी गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Bhiwandi Crime News : रिकव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चोरीकडे वळवला.

ठाणे : कर्ज रिकव्हरी एजंट असणाऱ्यांनी आपला मोर्चा चोरीकडे वळवला आणि तब्बल 18 रिक्षांची चोरी केली, आता त्यांना पोलिासांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, भिवंडी (Bhiwandi Crime News) येथे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने पोलिस आयुक्तांनी पोलिस पथकांना विशेष लक्ष घालून मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने चार जणांच्या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याककडून 20 लाख रुपयांच्या 18 रिक्षा जप्त केल्या.

पोलिसांनी या चोरांकडून 12 गुन्ह्यांची उकल केली आहे अशी माहिती गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी भिवंडीत पत्रकार परिषदेत दिली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई 

रिक्षा ज्या भागातून चोरीस गेल्या होत्या त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. रिक्षा चोरी करणारे भिवंडी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्या ठिकाणी रशीद युनुस खान,वय 38, रा. अंधेरी प. मुंबई, सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना,वय 38,रा. मुंब्रा, ठाणे, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी, वय 42,रा. कौसा, मुंब्रा, ठाणे आणि जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी, वय 35, रा. सिद्धीकीनगर, धुळे या चौघांना ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून ओशिवरा आणि जुहू पोलिस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दोन रिक्षा जप्त केल्या. या चौकडीकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यातून एकूण 18 रिक्षा जप्त केल्या.

सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजेंट म्हणून काम करीत होते. त्यांना रिकव्हरी कंपनीने काढून टाकल्याने त्यांना लॉक असलेली वाहनं लॉक तोडून सुरू करुन घेऊन जाण्याची पद्धत माहिती असल्याने त्यांनी आपला मोर्चा वाहन चोरीकडे वळवला.

या माध्यमातून चोरी केलेली वाहने धुळे येथील साथीदार जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी यास विक्री करीत होते. त्यानंतर तो या चोरी केलेल्या रिक्षा धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव या परिसरात विक्री करीत होता. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
Pandharpur Crime News: आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू;
'50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget