Bhiwadi Sex Worker Murder: भिवंडीत सेक्स वर्करची हत्या, एक क्लू सापडला, 48 तासात आरोपीला बंगालमध्ये बेड्या
गीतांजली एक्स्प्रेसमधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलिस पथकाने आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिकला ताब्यात घेतले.
भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) एका सेक्स वर्कर महिलेच्या हत्येच्या (Sex Worker Murder) घटनेनंतर 48 तासांत आरोपीला अटक करून खुनाचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. आरोपीचे नाव आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिकला आहे. आकाशने भिवंडीत एका सेक्स वर्कर महिलेची डोक्यात पाटा वरवंटा घालून निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी (Bhiwandi Police) घटनेच्या 48 तासांच्या आत आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक याला पश्चिम बंगाल येथून अटक करून खून प्रकरणाचा छडा लावला. हत्येनंतर ओडिसा राज्यात पळून जात असताना पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात पकडण्यात आले आहे.
भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेच्या डोक्यात पाटा वरवंटा घालण्यात आला. मागील सहा सात महिन्यांपासून ही महिला या ठिकाणी राहत आहे. 21 नोव्हेंबर रोजी रात्री देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेसोबत तरुणाचे भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की, तरुणाने खोलीतील दगडी पाटा वरवंटा महिलेच्या डोक्यात मारून तिची हत्या केली आणि पळून गेला. या वेळी घटनास्थळी तातडीने पोलिस पथकासह दाखल झाले.
मूळगावी पळून जाताना ठोकल्या बेड्या
भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी त्याठिकाणी हत्या करणाऱ्या युवकासोबत आलेल्या मित्राला ताब्यात घेतले. मित्राकडे चौकशी केली असता हत्या करणाऱ्या युवकाचा फोटो आणि वर्णन पोलिसांना मिळाले. आरोपी आपल्या मूळगावी पळून जाण्याची माहिती मिळाली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस शिपाई नितीन नंदीवाले, संजय भोसले हे तातडीने त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले.
1 डिसेंबरपर्यंत आरोपीस पोलिस कोठडी
आरोपीला आपल्या मूळगावी जाण्यासाठी पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात रेल्वे बदली करावी लागते. त्यामुळे आरोपी हा गीतांजली एक्स्प्रेसमधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलिस पथकाने आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिकला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 1 डिसेंबरपर्यंत आरोपीस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हे ही वाचा :