Bhandara Crime News : प्राध्यापकाकडून सहकारी प्राध्यापक महिलेचा विनयभंग; बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार
Bhandara Crime News : भंडारा शहरातील शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकानं सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bhandara News भंडारा : भंडारा शहरातील (Bhandara) शासकीय बीएड महाविद्यालयात कार्यरत असेलया एका प्राध्यापकानं सहकारी महिला प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची (Bhandara Crime) धक्कादायक घटना समोर आली आहे. भावी शिक्षक घडविणाऱ्या पवित्र महाविद्यालयातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पिडीत महिला प्राध्यापकाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) संशयित आरोपी प्रध्यापकाविरुद्ध कलम 354, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 14 मार्चला दुपारी महाविद्यालयाच्या स्टाफची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः दिली असल्याने हा प्रकार उघड झालाय.
बीएड शासकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार
विदर्भातील एकमेव शासकीय बीएड महाविद्यालय भंडारा शहरात आहे. दरम्यान या महाविद्यालयात कार्यरत महिला सहायक प्राध्यापिकेचे पती हे मिझोराम येथे आर्मीत देश सेवा करीत आहे. तर पीडित महिला प्राध्यापिका या त्यांच्या एका मुलीसह भंडाऱ्यात राहतात. 14 मार्चच्या दुपारी महाविद्यालयाच्या स्टॉपची बैठक सुरू असताना हा प्रसंग घडल्याची माहिती पिडीतेने स्वतः पत्रकार परिषदेत सांगितली आहे.
घटनेतील प्राध्यापकाने पीडित महिला प्राध्यापिकेच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. प्राध्यापकाच्या अचानक अशा वागण्याने पीडित महिला भांबावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या भंडारा पोलीस करीत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
गोठ्याला लागलेल्या आगीत 22 शेळ्यांसह कोंबड्यांचा होरपळून मृत्यू
भंडारा जिल्ह्याच्या निमगाव येथे काल, 16 मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीत गोठ्यात बांधून असलेल्या 22 शेळ्यांसह दहा कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर, आगीच्या रौद्ररूपाने घरातील संपूर्ण जिवनोपयोगी साहित्यांचीही राखरांगोळी झाली आहे. सोबतच आग विझविण्याच्या प्रयत्नात घरातील लहान मुलगाही किरकोळ जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास मच्छरांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तो कमी करण्यासाठी आपदाग्रस्त शेंडे कुटुंबियांनी घराच्या समोरील भागात धूप जाळले होते. त्या आगीची चिंगारी उडून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. यात शेंडे कुटुंबियांचे लाखोरुपयांचे नुकसान झाले असून जवळ होतं नव्हते ते सारेच आगीने हिरावून घेतल्याची भावना पीडित कुटुंबीयांनी बोलतांना व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या