एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट

Massajog Sarpanch Santosh Deshmukh Case Bail Rejected: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेचा जामीन अर्ज मकोका न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

बीड : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला जयराम चाटे (Jairam Chate) याचा जामीन अर्ज मकोका न्यायालयाने (MCOCA Court) फेटाळून लावला आहे. 10 जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला.

विशेष म्हणजे, जयराम चाटे याने जामिनासाठी न्यायालयात दिलेले कारण अत्यंत धक्कादायक होते. मात्र, न्यायालयाने त्याचे दावे फेटाळत त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

Jairam Chate Reason For Bail : जामिनासाठी दिली 'ही' कारणे

आरोपी जयराम चाटे याने मकोका न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात (Bail Plea) स्वतःला निर्दोष सांगत आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केला होता. याशिवाय त्याने जामीन मिळण्यासाठी एक अजब युक्तिवाद केला होता. 'मला दहावी आणि बारावीत खूप चांगले गुण (Marks) मिळाले आहेत, तसेच मी बीएससी (BSc) पदवीधर सुशिक्षित तरुण आहे,' असे कारण त्याने न्यायालयात दिले होते.

मात्र, न्यायालयाने आरोपीचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. परीक्षेत चांगले गुण मिळवणे आणि उच्च शिक्षण असणे, हे एवढ्या गंभीर गुन्ह्यात जामीन देण्याचे कारण असू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने जयराम चाटेचा जामीन अर्ज थेट फेटाळला.

Sarpanch Santosh Deshmukh Flashback : संपूर्ण चित्रपटगृहासारखा थरार

9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात सुदर्शन घुलेच्या शेतात नेले होते. तिथे आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅस पाईपने बेदम मारहाण केली. त्यांचे हात-पाय तोडून त्यांना अक्षरशः हालहाल करून मारण्यात आले. 

अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हे अमानुष हत्याकांड सुरू असताना आरोपींनी वाल्मिक कराड या परळीतील गुंडाला 'व्हिडिओ कॉल' (Video Call) करून हा सगळा प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आला होता. वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता.

Beed Crime News : 1800 पानांचे चार्जशीट, 15 व्हिडिओ आणि 8 फोटो

या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात तब्बल 1,800 पानांचे दोषारोपपत्र (Santosh Deshmukh Case Charge sheet) दाखल केले आहे.

आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांना हत्येचे थेट 15 व्हिडीओ आणि 8 फोटो मिळाले आहेत. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना आणि आनंद साजरा करताना स्पष्ट दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती. संपूर्ण भक्कम पुरावे पाठीशी असल्याने आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला कारागृहातच ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget