एक्स्प्लोर

Beed : हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला

Beed Crime : कीर्तनकार कैलास आनंदे यांना लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Beed Assault : गेवराई (Georai) गावातील काही व्यक्तींनी कीर्तनकार कैलास आनंदे (Kailas Anande) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

कीर्तनकार कैलास आनंदे हे स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात. गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी त्यांना आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर अडवून त्यांना बेदम मारहाण केली.

Beed Harinam Saptah Dispute : हिशोब विचारल्याने वाद चिघळला

अखंड हरिनाम सप्ताहासाठी जमा झालेल्या निधीचा हिशोब मागितल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाल्याने धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीत कैलास आनंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Beed CCTV Footage : मारहाणीचा व्हिडीओ समोर

या हल्ल्याचे सर्व चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. मारहाणीदरम्यान हल्लेखोरांनी 'याचा संतोष देशमुख करून टाका' असं म्हटल्याचा दावा जखमी कैलास आनंदे यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती आनंदे यांनी दिली. 

Beed Police Investigation : कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेनंतर आनंदे कुटुंबीय दहशतीत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आणि बीड पोलिस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Ramdhan Maharaj Death : भजन सुरू असतानाच रामधन महाराज राठोड यांचे निधन

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन राठोड (Ramdhan Maharaj Rathod) यांचे भजन सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

प्रवचन आणि भजन कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget