एक्स्प्लोर

Beed Crime: 'तू काळी... पांढऱ्या पायाची...'; सततचा मानसिक छळ, नंतर डोक्यात धारदार शस्त्रानं वार; विवाहितेला सासरच्या मंडळींनी संपवलं

पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाने सध्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आली. यात पोलिसांनी केलेल्या तपासात सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाने सध्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

Beed Crime: नेमकं प्रकरण काय?

बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे एका महिलेचा मृतदेह संध्या किसन घुले हिचा 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी विवाह झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देऊनही लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. 'तू काळी आहेस.. स्वयंपाक येत नाही.. पांढऱ्या पायाची आहेस...' असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्यांनी सुरू ठेवला. तर माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिला तीन महिने माहेरी आली होती. परंतु, दीड वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. 

Beed Crime:घराजवळच्या विहिरीत संध्याची चप्पल आढळली अन् ..

याच दरम्यान 8 जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरी जवळ आढळून आली. सासरच्या लोकांनी माहेरच्या मंडळींना याची कल्पना दिली. यावेळी विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह तरंगताना आढळला. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केलाच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच हातापायावरही जखमा होत्या. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. 

दरम्यान या प्रकरणात काल गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील पती आणि सासरा या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर सासूचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार गेवराईत समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे विवाहितेचा बळी गेल्याने न्यायाची प्रतीक्षा पीडित कुटुंब करत आहे.

हेही वाचा:

बीडमध्ये भयंकर घटना, महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट अन् काठीने पाठीची चामडी सोलेपर्यंत अमानुष मारहाण, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget