एक्स्प्लोर

Beed News : बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यात तणावाची स्थितीपाहता 25 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू, नेमकं कारण काय?

Beed News : बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता येत्या 25 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आलेत.

Beed News : मराठवाड्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक कारणांनी सध्या जोरदार चर्चेत आला आहे. त्यात प्रामुख्यांने जिल्ह्यातील गुन्हेगारी (Beed Crime) आणि राजकारण हा या चर्चेचा केंद्रबिंदू असल्याची चर्चा आहे.अशातच आता बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता येत्या 25 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आलेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावर होऊ लागले आहेत. तर बॅनरबाजीमुळेही अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आजपासून(13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी दिली आहे. (Beed Crime News)

पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध

दरम्यान, शासन निर्णया संबंधित आदेश देखील काढले आहेत. या दरम्यान काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वाची धुरा महिला सांभाळणार

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. या मध्ये बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. तर 11 पैकी 6 पंचायत समित्यांच्या सभापतीही महिला होणार आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून अद्याप एकदाही अनुसूचित जातीला अध्यक्षपदासाठीचे प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, यंदा मात्र अनुसूचित जातीला ही संधी मिळाली आहे. तर 11 पैकी 3 पंचायत समित्यांच्या सभापती या सर्वसाधारण प्रवर्गातील महिला, 2 पंचायत समित्यांच्या सभापती ओबीसी प्रवर्गातील महिला होणार आहेत. तर अनुसूचित जातीची महिलाही एका पंचायत समितीची सभापती होणार आहे. थोडक्यात जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलाराज निर्माण होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Thane : तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget