एक्स्प्लोर

धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीडमध्ये आपल्या 22 वर्षीय प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.

बीड : बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. घटनेनंतर आरोपी मात्र फरार आहे.

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटना घडली. सावित्रा (वय 22) असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.

गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं.  त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.

घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर संबंधित लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली.  पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तसेच सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान पीडितेचे 48 टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणुसकी जिवंत आहे का ? असा प्रश्न निर्माण झालाय. तसेच परिसरात खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Jalgaon : 89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Embed widget