एक्स्प्लोर

Asim Sarode : राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 

Asim Sarode on Raj Thackeray : आरोपीला ठार मारणाऱ्याला आमदार-खासदार करा असं प्रवीण तरडे म्हणाले, मग ते स्वतःच का आरोपीला मारायला जात नाहीत असा सवाल असीम सरोदे यांनी विचारला. 

मुंबई : नसरापूर प्रकरणी चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या (Nasrapur Girl Death) आपल्या सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवणारे वक्तव्य केलं. राज ठाकरेंसारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य चुकीचं आहे. पोलिसांनी त्यांना समज द्यावी असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं. तसेच प्रवीण तरडेंनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. आपल्या सर्वांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी आरोपीला कायद्याच्या प्रक्रियेतूनच शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले. 

आरोपीला फाशीच होणार

असीम सरोदे म्हणाले की, "नसरापूर या गावात एका 75 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या चिमुरडीच्या कुटुंबाचे दुःख आपण कुणीही समजून घेऊ शकत नाही. त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. या केसमध्ये 101 टक्के त्या नराधमाला फाशीची शिक्षाच होणार हे कायदेशीर वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे."

असीम सरोदे पुढे म्हणाले की, "या प्रकरणात काहीही बेताल वक्तव्य करत लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि त्या माणसाला हालहाल करून मारा, आपणच त्याला शिक्षा देऊयात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे प्रवीण तरडे यांनीसुद्धा असं वक्तव्य केलं. त्या आरोपीला मारणाऱ्याला आमदार खासदार करा असं प्रवीण तरडे म्हणाले. असं असेल तर प्रवीण तरडे स्वतःच का जात नाहीत? स्वतः त्या आरोपीला मारून आमदार आणि खासदार का होत नाहीत? आमदार आणि खासदार व्हायचे कायदेशीर निकष आता तुम्ही बदलणार का?" 

राज ठाकरेंवर गुन्हा नोंद होऊ शकतो

असीम सरोदे म्हणाले की, "तुमच्या भावना जरी बरोबर असल्या तरी कायद्याचं एक तत्व आहे. आरोपीला त्याची बाजू मांडू देऊन, कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवू नये. हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी समज पोलिसांनी राज ठाकरेंनादिली पाहिजे. राज ठाकरे आणि प्रवणी तरडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही नोंद होऊ शकतो."

Raj Thackeray On Nasrapur : राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

नसरापूरच्या घटनेनंतर राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला. नसरापुरच्या नराधमाला हाल हाल करुन संपवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय. तसंच  महाराष्ट्रात कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली.

ही बातमी वाचा:

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतात काम करणाऱ्या महिलेला भरदिवसा गोळ्या झाडून संपवलं, धक्कादायक घटनेनं माळशिरस हादरलं
शेतात काम करणाऱ्या महिलेला भरदिवसा गोळ्या झाडून संपवलं, धक्कादायक घटनेनं माळशिरस हादरलं
मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई, 10 कोटी 65 लाख रुपयांचं कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Embed widget