Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Amit Thacekray: "काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सबळ चालू आह, अशा शब्दात मनसे नेने अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांनी मुंबईत महापालिकेच्या गलथान कारभाराने शाॅक लागलेल्या दोन मुलींची भेट घेतली. यावेळी फोडाफोडीवर संताप व्यक्त केला.
आपल्याला राग नाही येत का?
अमित ठाकरे म्हणाले, भीषण भीषण परिस्थिती चालू आहे आपल्या अख्ख्या राज्यात. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं कळत नाही. महानगरपालिकेमुळे शॉक लागून दोन मुली बिचाऱ्या हॉस्पिटल बेडवर आहेत, मुंबईमध्ये झाडं कोसळून लोक मरतायत, पॉट होलमध्ये जाऊन लोक मरतायत. ते पुढे म्हणाले की, तो भाजपचा झाटम, लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. मी या विषयावर काय बोलायचं? मला वाटतं की आपल्याला राग नाही येत का? नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय यापेक्षा घाण काय असू शकतं? सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे. तुम्ही का हसताय? कारण का तर तीन वर्ष निवडणुका नाहीयेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितलाय, असा हल्लाबोल त्यांनी केला.




















