एक्स्प्लोर

Ashok Kharat: एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!

Ashok Kharat: नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या तपासात आता मोठी घडामोड समोर आली आहे.

Ashok Kharat: नाशिकमध्ये (Nashik Crime News) गाजत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात आता मोठी घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण अचानक बदलत खरातला अज्ञातस्थळी हलवले असून, या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे सुरू असलेली चौकशी आता नव्या ठिकाणी हलवण्यात आली आहे. या चौकशीला एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते (Tejaswini Satpute) स्वतः उपस्थित राहून तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कालच खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती, तर आजही त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.

Ashok Kharat: ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी ताब्यात 

या दरम्यान, तपासाचा विस्तार करत SIT ने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या चौकशीमधून मंदिर आणि खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Kharat: पोलिसांसमोरच खरात, जाधवमध्ये खडाजंगी

दरम्यान, या प्रकरणात आधीच मोठे धागेदोरे समोर आले आहेत. खरात आणि त्याचा निकटवर्तीय नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती आहे. तसेच, नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासात 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळले असून, नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. 

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाकडूनही चौकशी

याशिवाय, अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाचीही एन्ट्री झाली असून, त्याच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची सखोल चौकशी सुरू होणार आहे. देणगीदार, भागीदार आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार असल्याने, या प्रकरणातून मोठा आर्थिक घोटाळाही समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच, SIT कडून सुरू असलेल्या या बहुआयामी तपासामुळे अशोक खरात प्रकरणाचा उलगडा अधिक वेगाने होत असून, येत्या काळात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ashok Kharat SIT: एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली

भोंदूबाबा अशोक खरातच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली आहे.  एसआयटी टीममधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थानच्या संदर्भातील एसआयटी चौकशी सुरु आहे. खरात विरोधातील चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटी चा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर अशोक खरात प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन्ही आरोपींची देखील एसआयटी कडून चौकशी होणार आहे. दिनेश परब, राजेंद्र जासूद या दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात अशोक खरातने तक्रार केली होती. खरातने काही व्हिडिओ आणि अश्लील फोटो असल्याची धमकी देत पैसे मागितल्याची तक्रार दिली होती. आता अशोक प्रकरणात खरातसह एकूण आठ जणांची एसआयटी कडून चौकशी सुरु आहे.  

आणखी वाचा 

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई अन् चाकणकरांमध्ये कोट्यवधींची डील? रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा; म्हणाल्या...

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget