एक्स्प्लोर

खरातला पोटाचे विकार, दोन वेळा उपचार; डॉक्टरशी ओळख केली अन् शिवनिका संस्थेच्या विश्वस्तपदासाठी घातली गळ; भोंदूबाबा प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा एसआयटीकडून वाचला जात असतानाच, आता त्याच्या 'शिवनिका' संस्थेतील विश्वस्तांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापकर्मांचा पाढा एसआयटी (SIT) कडून वाचला जात असतानाच, आता त्याच्या 'शिवनिका' संस्थेतील विश्वस्तांबाबत नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरातला असलेल्या पोटाच्या विकाराचा फायदा घेत त्याने एका नामांकित डॉक्टरांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना संस्थेचे विश्वस्त केल्याचे उघड झाले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातवर दोन वेळा पोटाच्या व्याधीवर उपचार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याला गेल्या काही काळापासून पोटाचा गंभीर विकार होता. या व्याधीवर उपचार करण्यासाठी तो डॉ. नंदकिशोर कातोरे यांच्याकडे गेला होता. डॉ. कातोरे यांनी खरातवर दोनवेळा पोटाच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले. सुरुवातीला हे नाते केवळ डॉक्टर आणि रुग्ण इतकेच मर्यादित होते. मात्र, उपचार यशस्वी झाल्यानंतर खरातने या ओळखीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.

Ashok Kharat Nashik Crime News: गळ घातली अन् विश्वस्त केले!

ऑपरेशननंतर खरातने डॉ. कातोरे यांच्याशी जवळीक वाढवली. आपल्या तथाकथित आध्यात्मिक कार्याचा प्रभाव टाकत त्याने डॉक्टरांना आपल्या 'शिवनिका' संस्थेचे विश्वस्त होण्यासाठी वारंवार गळ घातली. खरातच्या आग्रहाखातर अखेर डॉ. कातोरे यांचा विश्वस्त म्हणून समावेश करण्यात आला.

Ashok Kharat Nashik Crime News: डॉ. कातोरे यांचे स्पष्टीकरण

या प्रकरणावर डॉ. नंदकिशोर कातोरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "खरातशी माझे केवळ डॉक्टर आणि रुग्ण म्हणूनच संबंध होते. उपचारांनंतर वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने मला संस्थेत येण्यासाठी आग्रह केला. मात्र, माझा त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी संबंध नाही."

Ashok Kharat Nashik Crime News: SIT च्या तपासाकडे सर्वांचे लक्ष

खरातने आपल्या संस्थेमध्ये अशाच प्रकारे किती प्रतिष्ठित व्यक्तींना 'गळ' घालून विश्वस्त म्हणून सामावून घेतले आहे, याचा तपास आता एसआयटी करत आहे. संस्थेच्या नावाखाली नेमके कोणते आर्थिक व्यवहार झाले आणि त्यात विश्वस्तांची भूमिका काय होती, हे आता पोलीस चौकशीत स्पष्ट होईल. भोंदूगिरीच्या या जाळ्यात केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर उच्चशिक्षित वर्गही कसा ओढला गेला, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Brother Dilip Kharat: भोंदू खरातच्या भावाचा 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात समावेश? आता दिलीप खरात मैदानात; केसरकरांशी संबंधांच्या आरोपाबाबत सगळंच सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget