एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातने दीपक केसरकरांशी सेटिंग लावून भावाला कंत्राट मिळवून दिलं? 'शालार्थ आयडी' घोटाळ्यातही सहभाग

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकच्या अशोक खरातने शिक्षण विभागात राजकीय वजन वापरून भावासाठी शालार्थ आयडी मिळवल्याचा संशय. 2022 मधील या प्रकरणाने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकचा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता केवळ अध्यात्म आणि जमिनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. राज्याच्या शिक्षण विभागातही खरातने आपले वजन वापरून 'शालार्थ आयडी' घोटाळा केल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या कार्यकाळात खरातने आपल्या भावासाठी नियमांना बगल देऊन हा आयडी मिळवल्याची चर्चा आता रंगली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: भावासाठी 'राजकीय' वजनाचा वापर?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील 'न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज'मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2022 मध्ये जेव्हा दीपक केसरकर राज्याचे शिक्षणमंत्री होते, त्या काळात दिलीप खरात याला 'शालार्थ आयडी' मिळवून देण्यात आला. हा आयडी मिळवण्यासाठी अशोक खरातने आपली राजकीय ऊठबस आणि वजन वापरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: शिक्षण विभागात 'दबक्या आवाजात' चर्चा

शालार्थ आयडी मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि पारदर्शक असते. मात्र, खरातने थेट मंत्रालयातील किंवा शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावर मध्यस्थी करून ही फाईल मंजूर करून घेतल्याचे बोलले जात आहे. आयडी खरा की बोगस? दिलीप खरात याला मिळालेला हा शालार्थ आयडी कायदेशीर प्रक्रियेतून मिळाला आहे की तो 'बोगस' आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. इतर फाईल्सचे काय? केवळ भावासाठीच नाही, तर शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित फाईल्स खरातने आपल्या 'सेटिंग'ने मार्गी लावल्याची चर्चा शिक्षण विभागात दबक्या आवाजात सुरू आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: दीपक केसरकरांचे नाव चर्चेत

या प्रकरणात थेट माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव जोडले गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातने केसरकरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नावाचा वापर करून हे काम फत्ते केले का? याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. जर हा शालार्थ आयडी चुकीच्या पद्धतीने दिला गेला असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार असू शकते.

Ashok Kharat Nashik Crime News: चौकशीचा घेरा वाढणार? 

अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक संबंधांची तपासणी सुरू आहे. आता शिक्षण विभागातील या 'शालार्थ आयडी' कनेक्शनमुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. एसआयटी (SIT) या प्रकरणाची कागदपत्रे पडताळून पाहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

दरम्यान, अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी एसआयटी, सायबर तज्ञ आणि फॉरेन्सिक टीमकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या डेटामधून मोठे आर्थिक व्यवहार आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातचे कोणाकोणाशी आर्थिक संबंध होते याचाही तपास सुरू असून संबंधित व्यक्ती एसआयटीच्या रडारवर आहेत. पुराव्यांच्या आधारे समक्ष चौकशी करण्यासाठी न्यायालयाने अशोक खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची 1500 कोटींची 'आर्थिक कुंडली' बाहेर येणार; पोलिसांच्या रडारवर आता 'तो' खास सीए!

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget