एक्स्प्लोर

Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

Nashik Crime news: केबिनमध्ये महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर अशोक खरात हा त्या महिला गर्भवती होऊ नयेत,यासाठी खबरदारी म्हणून एखाद्या औषधाचा वापर करायचा, असा संशय पोलिसांना आहे.

Ashok Kharat Crime: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सुरु असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आयपीएस तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून प्रत्येक दिवशी अशोक खरात (Ashok Kharat) याची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी सलग 13 व्या दिवशी अशोक खरात याची चौकशी सुरु झाली आहे. अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. यानंतर त्याला पुन्हा पोलीस कोठडीत (Police Custody) पाठवले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्या कोर्टात नेण्यापूर्वी अशोक खरात याच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. यादृष्टीने एसआयटीच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध (Contraceptive pills ) वापरत असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे. (Nashik Crime news)

या संशयामुळे अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच महिलांना संमोहित करण्यासाठीही अशोक खरात काही औषधांचा वापर करता होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे एसआयटीकडून बुधवारी न्यायालयात एखादी गंभीर बाब समोर आणली जाण्याची शक्यता आहे. 

आज सकाळपासून एसआयटी पथकाने पुन्हा एकदा चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी पोलिसांनी अशोक खरात हा चौकशीत सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितले होते. महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा विषय निघाल्यावर अशोक खरात उडवाउडवीची उत्तरे देतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बुधवारी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. सध्या पोलिसांनी अशोक खरात याच्या मोबाईलमधील रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास सुरु आहे. 

यामध्ये कॉल रेकॉर्डस आणि Whatsapp चॅटसचा समावेश आहे. त्यादृष्टीने अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरु आहे. अशोक खरात याच्या मोबाईल डेटावरुन पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. खरातने अनेक  राजकारण्यांचे मोबाईल नंबर कोर्डवर्डमध्ये सेव्ह केल्याची माहिती आहे. या सगळ्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर आगामी काळात अशोक खरात याच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

आणखी वाचा

भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; तीन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश, सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'आरोपी जामिनास...'
सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; तीन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश, सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'आरोपी जामिनास...'
Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget