एक्स्प्लोर

Ashok Kharat: अशोक खरात पूजा करुन 20 फुटी भुजंगाला बोलवायचा, भक्त भीतीने थरथर कापायचे, दरबारात नेते मंडळींच्याही रांगा; भोंदूबाबाची हादरवणारी कहाणी

Ashok Kharat: नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्यासह देशाला हादरवून सोडले आहे.

Ashok Kharat: नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्यासह देशाला हादरवून सोडले आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तीही त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अशोक खरात हा लोकांच्या अडचणी सोडवतो, भविष्य सांगतो आणि यशाचा मार्ग दाखवतो, असा दावा करत होता. 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे जाऊन पूजा केल्यानंतर खरात अचानक चर्चेत आला आणि त्याची प्रसिद्धी राज्यभर पसरली. त्यानंतर राजकारणी, पोलीस अधिकारी, उद्योजक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा त्याच्याकडे वावर वाढू लागला.

Ashok Kharat: पोलीस तपासात ‘मोडस ऑपरेंडी’ उघड

नाशिक पोलिसांनी बुधवारी रात्री खरातला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची कसून चौकशी करत असून, या तपासात त्याने लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेली पद्धत (मोडस ऑपरेंडी) समोर येत आहे. त्याचबरोबर, राजकीय वर्तुळाशी त्याचे संबंध कसे मजबूत झाले, याचाही तपास सुरू आहे.

Ashok Kharat: मिरगावातील मंदिरातून ‘दरबार’ 

सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिर उभारल्यानंतर खरातने आपला ‘दरबार’ सुरू केला. ज्योतिष, अंकशास्त्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तो लोकांच्या अडचणी सोडवण्याचा दावा करत असे. अपत्यप्राप्ती, वैवाहिक समस्या, नोकरीतील अडथळे, राजकीय भविष्य अशा विविध कारणांसाठी लोक त्याच्याकडे धाव घेत असत. विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी त्याच्या दरबारात मोठी गर्दी होत असे, ज्यामध्ये श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचाही मोठा सहभाग असायचा.

Ashok Kharat: पूजा करुन 20 फुटी नागाला बोलवायचा

नाशिक हे धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असल्याचा फायदा घेत खरातने ‘सर्पपूजा’चा प्रकार सुरू केला. दरबारात जमलेल्या भाविकांसमोर तो ध्यानस्थ बसून तंत्र-मंत्रांचा जप करीत असे. काही वेळानंतर अचानक 20 फुटांचा नाग प्रकट होत असल्याचा आभास निर्माण केला जात असे. खरातच्या इशाऱ्यावर हा नाग फणा काढून डोलत असल्याचे दृश्य पाहून उपस्थित भाविक घाबरून जात असत. या प्रकारामुळे अनेकांना खरातकडे दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण होत असे. काही जण भीतीने बेशुद्ध पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात हा सगळा प्रकार पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचे समोर येत आहे.

Ashok Kharat:  महिलांना एकटं बोलावून करायचा शोषण

भक्तांच्या मनात भीती आणि अंधश्रद्धा निर्माण करून त्यांना आपल्या प्रभावाखाली ठेवणे, हीच खरातची मुख्य पद्धत असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. एकदा विश्वास बसल्यानंतर तो महिलांना वेगवेगळ्या कारणांनी एकटं बोलावून त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप आहे. एकूणच, धार्मिक श्रद्धा, भीती आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत अशोक खरातने मोठं जाळं उभं केलं होतं. आता या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Raj Thackeray on Ashok Kharat Case: देवेंद्र फडणवीस, धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा अन्...; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget