एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: भोंदूचा कारनामा...पहिले मोकळा हात दाखवला, मग हवेतून काजू कतली काढली आणि अशोक खरात म्हणाला...

Ashok Kharat Case: काजू कतलीच्या चमत्काराने त्याचा सीए भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे.

Ashok Kharat Case: महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरात (Ashok Kharat) याला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी (SIT) पुन्हा एकदा अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यांत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या सुनावणीआधी या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काजू कतलीच्या चमत्काराने त्याचा सीए भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. हवेतून काजू कतली काढत सीए यांच्यावर अशोक खरातने अंधश्रद्धेचे जाळे टाकले. मोकळा असलेला हात सीए यांच्याकडे दाखवत अशोक खरातने काजू-कतली काढत हा घ्या प्रसाद...असं म्हणाला. 2017 मध्ये भोंदू खरातच्या भेटीसाठी आले असताना हातचालाकी करत सीए यांना अशोक खरातने चमत्कार दाखवले. तसेच आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहानाने सीए यांच्याकडून कोट्यावधी रुपयेही अशोक खरातने उकळल्याचे समोर आले आहे. कोट्यावधी रुपये उकळत भोंदू खरातने केलेली फसवणूक पाहता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ashok Kharat Case)

अशोक खरात फार्महाऊसवरही महिलांसोबत नको नको ते करायचा- (Ashok Kharat Case)

अशोक खरातच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून, यामुळे खरातच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरातचे सर्व कारनामे उघड केले आहेत. आता या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

अशोक खरातचं पोलीस कोठडीत नवीन नाटक- (Ashok Kharat Case)

महिला अत्याचाराच्या सहव्या गुन्ह्यात अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. यादरम्यान, अशोक खरात पुन्हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. आधी कोणतीही उत्तर न देणारा, उत्तरं देण्यास टाळाटाळ करणारा अशोक खरात आता काही आठवत नसल्याचे नाटक करत आहे. पोलीस तपासपासून सुटका करण्यासाठी अशोक खरातची ही गजनी ट्रिक चर्चेत आहे. याधी डोकं दुखत असल्याचं प्रकृती अस्वस्थ असल्याचा अशोक खरातने बहाणाही केला होता. (Ashok Kharat Nashik Case)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat: अशोक खरातचं कोठडीत नवीन नाटक; पोलीस तपासातून सुटका करण्यासाठी 'गजनी' ट्रिक

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Embed widget