मुंबईत 2400 किलोपेक्षा जास्त वजनाच्या अंमली पदार्थसह 19 कोटींची संपत्ती जप्त, एकाला अटक
Mumbai: मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज मोठी कारवाई करत तब्बल 2400 किलो पेक्षा जास्त वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपाला अटक केली आहे.
Mumbai: मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज मोठी कारवाई करत तब्बल 2400 किलो पेक्षा जास्त वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपाला अटक केली आहे. या आरोपाचे नाव प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग असल्याची माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या आरोपीची पोलिसांनी तब्बल 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 मुल्याची संपत्ती जप्त केली आहे.
अंमली पदार्थाच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या पैसे कमावू कोट्याधीश झालेला प्रेमप्रकाश सिंगची जीवनशैली आलिशान होती. पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची व बँक खात्याची माहिती घेतली असता त्याने अंमली पदार्थाच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या 18 कोटी 43 लाख 56 हजार 334 रुपये मुल्याचे 2 फ्लॅट, 9 गाळे, 1 मोबाईल आणि कार खरेदी केली होती. तसेच प्रेमप्रकाश सिंग याचे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे 6 बँक खात्यातील शिल्लक रक्कम 1 कोटी 14 लाख 88 हजार 216 रुपये आहे.
पोलिसांनी एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 68-E आणि 68-F च्या तरतुदींनुसार आरोपी प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग याने बेकायदेशीरपणे मिळवलेल्या मालमत्तेची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आरोपीची कुठे आणि किती मालमत्ता आहे याबाबत पोलिसानी माहिती दिली आहे.
1. बँक खाती : सहा बचत खाती त्यापैकी पाच खाती IDBI बँकेत आहेत आणि एक Axis बँकेत आहे. या खात्यांमध्ये एकूण शिल्लक रक्कम रु. 1,14,88,216/- (एक कोटी चौदा लाख अठ्ठ्याशी हजार दोनशे सोळा रुपये)
2. फ्लॅट क्र. ३१०६, ए विंग, निश्चय मनचंद चुन्नीलाल कंपाउंड, एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व).मुंबई. मूल्य रु. 8000000 /-
3. दुकान क्रमांक 10A, तळमजला, पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, S.V. रोड, दहिसर पूर्व, किंमत रु. 55,00,०
4. फ्लॅट क्रमांक 3501, इमारत क्रमांक 01, नॉर्दर्न हाईट्स, एस.व्ही. रोड, दहिसर, मुंबई, 400068. मूल्य रु.55,00,000/-
5. गाला क्रमांक B/27, तळमजला, वर्धन औद्योगिक वसाहत, वर्धन नगर, गाव बिलालपाडा, तालुका वसई, जिल्हा.पालघर (जुने ठाणे), मूल्य रु. 13,00,000/-
6. दुकान क्रमांक 10B, तळमजला, पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, S.V. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.5500000/-
7. ऑफिस शॉप क्र.101, पहिला मजला, ए विंग, द पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.2,18,97,000/-
8. ऑफिस शॉप क्र. 102, पहिला मजला, ए विंग, द पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.1,97,12,400/-
9. ऑफिस शॉप क्र. 103, पहिला मजला, ए विंग, द पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.1,97,20,500/-
10. ऑफिस शॉप क्र. 104, पहिला मजला, ए विंग, द पोलारिस, तन्वी कॉम्प्लेक्स जवळ, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.7,74,93,500/-
11. दुकान क्रमांक 01, इमारत क्र. 05, नवरोज को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., शांती नगर, एस.व्ही. रोड, दहिसर पूर्व, मुंबई 400068. मूल्य रु.63,00,000/-
12. गाला क्रमांक B/28, तळमजला, वर्धन औद्योगिक वसाहत, वर्धन नगर, गाव बिलालपाडा, तालुका वसई, जिल्हा.पालघर (जुने ठाणे), मूल्य रु. 13,00,000/-
13. क्रेटा मोटर कार, नोंदणी क्रमांक GJ 15 CK 9564. मूल्य रु. 1600000/-
या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य 19,57,81,550 रुपये आहे( एकोणीस कोटी पन्नास लाख ऐंशी हजार पाचशे पन्नास).
या मालमत्ता अमली पदार्थांच्या तस्करीतून कमावलेल्या पैशातून मिळाल्याचे तपासादरम्यान सिद्ध झाल्याने, तपास अधिकाऱ्याने एनडीपीएस कायद्याच्या कलम 68-एफ अन्वये मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले असून सक्षम अधिकाऱ्याकडे अहवाल सादर केला आहे. आणखी मालमत्ता शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहे.