एक्स्प्लोर

अमरावतीत तब्बल 29 तलवारी जप्त, अमरावती पोलिस आता अॅक्शन मोडवर

जप्त करण्यात आलेल्या 29 तलवारीची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 45 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरावती :  मागील महिन्यात अमरावती शहरात तीन तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या आता पुन्हा तब्बल 29 तलवारी जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईचे महत्व वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन कंपनीचा अनडीलीव्हर्ड स्टॉक तसेच शिल्लक माल हा लिलाव करून इतर कंपन्यांना विकला जातो. पंजाबच्या भटिंडा येथील ब्रँड कॅन्सल या कंपनीने असाच माल खरेदी करून मध्य प्रदेशातील आरआरसी नामक कंपनीला विकला.  त्यानंतर या आरआरसी कंपनीकडून अमरावतीच्या लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन नामक कंपनीने काही माल मागविला ज्यात तब्बल 29 तलवारी निघाल्या. याची माहिती कंपनीच्या सुपर वायझरने राजापेठ पोलिसांना दिली. मागणी केली नसताना ही तलवारी आढळून आल्याने ही तक्रार करण्यात आली. राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पंचनामा करून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या 29 तलवारीची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 45 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ब्रँड कॅन्सल (भटिंडा, पंजाब), आरसीसी ग्रुप (बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) आणि लक्ष्मी गणेश कम्युनिकेशन (अमरावती) संचालकांवर कलम 4/25 आर्म ऍक्ट आणि G 26,29 आर्म ऍक्ट 1959 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात अमरावती शहरात तीन हत्येच्या घटना घडल्या नंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. 

संबंधित बातम्या :

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget