अक्षय शिंदेच्या वडिलांचा कोर्टात गंभीर आरोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं कनेक्शन थेट विधानसभा निवडणुकीशी जोडलं, म्हणाले...
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली आहे.
Akshay Shinde Encounter: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime News) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याचदरम्यान आज अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका केली आहे. या कथित चकमकीबरोबरच बदलापूर लैंगिक शोषणाबाबतच्या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचा आदेश देण्याची विनंतीही अण्णा शिंदे यांनी याचिकेत केली आहे. सध्या उच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांचा कोर्टात गंभीर आरोप-
मृत आरोपी अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) वडील अण्णा शिंदे हे कोर्ट रूममध्ये आले आहेत. याचिकाकर्ते यांचे वकील अमित कटारनवरे युक्तिवाद करत आहेत. मुलाने कोणताही त्रास नाही, असं रिमांड कॉपीत सांगितलं होते. जामिन होऊ शकतो का? यावर त्याने जामिन होऊ शकतो असंही सांगितलं होतं. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करायला सांगितले होते. माझ्या मुलाची पिस्तूल हिसकावण्याची हिंमत नाही. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भविष्यात निवडणूक असल्याने मुलावर रोष असल्याने त्याचा राजकाय फायदा घेतला जात असल्याचा संशय देखील अक्षयच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी कोर्टात नेमका काय युक्तीवाद केला?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू झालीय. देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज फिरत आहेत. न्यायव्यवस्थेची मग गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला. भविष्यात निवडणुका असल्याने राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. आरोपीच्या पत्नीनं बोईसर इथं दिलेल्या तक्रारीनुसार तिथं गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं. कोर्टाच्या परवानगीनं याप्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती. त्यासाठीच त्याला नेलं जात होतं, त्यादरम्यान आरोपी शांत बसला होता. तो अचानक आक्रमक होईल, अशी काही लक्षणं नव्हती, अशी माहिती सरकारने कोर्टात दिली.
संबंधित बातमी:
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?