एक्स्प्लोर

Pradeep Purnekar : ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल

Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकरांचा मारेकरी कोण आहे हे ठाणे पोलिसांनाही माहिती आहे, मात्र त्यांचे हात बांधले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला तरी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अद्याप अटक का करण्यात आली नाही? एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा का कामाला लावली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. पोलिसांसमोर सगळे पुरावे असतानाही ते काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, "ठाण्यात हत्या झाल्यानंतर सर्वत्र आक्रोश निर्माण झाला. राम पूर्णेकर हा त्याच्या वडिलांच्या हत्येवर न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेला असता पोलिसांनी रामलाच अटक केली. पोलीस आयुक्तांची आम्ही भेट घेतली आणि या हत्येसंबंधी माहिती घेतली. परंतु पोलीस काही प्रयत्न करत नाहीत. पूर्णेकर कुटुंबीयांनी जो व्हिडीओ दिला आहे त्यावर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे."

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला का लावली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच आम्ही न्याय मागत असताना ठाण्याच्या खासदारांची भाषा बघा, असं सांगत नरेश म्हस्के यांच्यावरही टीका केली. ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा झाला आहे. मग आता त्यांना अटक कधी करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. 

संजय राऊतांची मुख्यमंत्र्यावर टीका 

ठाण्याची अवस्था ही बीडपेक्षाही वाईट करून टाकली आहे. ही राजकीय हत्या असून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी घडवून आणली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राने इतका दुर्बल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या आधी कधीही पाहिला नाही, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 

स्वतः पोलीस आयुक्तांना माहिती आहे या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे. मात्र पोलिसांची हात बांधले आहेत. पोलिसांना पुरावे शोधता येत नसतील तर पोलीस खातं बरखास्त करा, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला. 

मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा 

प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी सातत्यानं पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे सेनेच्या निशाण्यावर असणाऱ्या मीनाक्षी शिंदेंनी शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदेंनी दिलं. आपला संबंध नसलेल्या काही प्रकरणांमध्ये नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पत्रात केला. मीनाक्षी शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Hingoli Crime News: घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget