एक्स्प्लोर

Nagpur Crime : केअरटेकरनेच केला घात, पोलिस उपनिरीक्षकाकडूनच अल्पवयीनवर अत्याचार

तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असल्याचे सांगून तो तिला चिखलदरा येथे घेऊन गेला. या दरम्यान त्याने तिला दारूही पाजली. यानंतर शुद्धीत नसलेल्या तरुणीवर त्याने अत्याचार केला आणि निर्वस्त्र करीत, फोटो काढले.

नागपूरः  नागपुरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज असल्याचे सांगून चिखलदरा येथे नेऊन पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. नागपुरात परतल्यावर तिने आई-वडीलांना आपबिती सांगितल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्या उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. ही घटना 13 जुलै रोजी घडली.

नागपुरातील नक्षलविरोधी अभियानात कार्यरत असलेल्या प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय 35, रा. फ्रेन्ड्स कॉलनी, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियानात तो पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यापूर्वीच ओळखीत असलेल्या 17 वर्षीय मुलगी त्याच्या संपर्कात आली. ती 12 वी मध्ये शिकते. तो तिचा केअरटेकरही होता हे विशेष. त्याचा फायदा घेत त्याने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज असल्याचे सांगून 13 जुलैला चिखलदरा येथे चारचाकी वाहनात नेले. तिथे एका लॉजवर नेले. दरम्यान त्याने ज्युसमधून गुंगीचे औषधही दिले. या दरम्यान त्यांनी दारूचेही सेवन केले. यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यावर तिला आपल्यासोबत अत्याचार झाल्याची बाब लक्षात आली. तिने विरोध केला. मात्र, ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतरही त्याने तिला निर्वस्त्र करीत, फोटो काढून स्वतःजवळ ठेवले. तसेच ते व्हायरल करीत, बदनामी करण्याची धमकी दिली. नागपुरात परत आल्यावर मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. त्यातून त्यांनी पोलिस ठाणे गाठून प्रदीपकुमार विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पॉक्सो अंतर्गत आरोपीला अटक केली आहे.

यापूर्वीही चौघां पोलिसांविरुद्ध गुन्हा

अत्याचार करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक हा विभागातील पाचवा पोलिस ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत लग्नाचे आमिष देत सातत्याने बलात्कार करणाऱ्या हेमंत हिरामण कुमरे या पोलिस शिपायावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तो लकडगंज वाहतूक विभागात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होता. तसेच जरीपटका येथे एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय गुडकेश्वर पोलिस ठाण्यात एका पोलिस उपनिरीक्षकावर तर गिट्टीखदान येथे पोलिस ठाण्यात, आणि नंदनवन येथील एका पोलिस निरीक्षकावरही गुन्हा दाखल आहे.

Mumbai Crime : मीरा रोडमध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला, हाताला दुखापत

महत्त्वाच्या बातम्या

ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर गंभीर जखमी करण्याचा होता प्लॅन, सिया आणि चेतनमध्ये नेमकी काय झाली होती चर्चा? धक्कादायक माहिती समोर 
केतनला मारण्याचा नाही तर गंभीर जखमी करण्याचा होता प्लॅन, सिया आणि चेतनमध्ये नेमकी काय झाली होती चर्चा? धक्कादायक माहिती समोर 
Pune Crime News: दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
Pune Crime News: पुण्यात प्रियकरानेच अश्लील व्हिडीओ काढून गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केलं, मित्रांसोबतही नको ते करायला लावलं
पुण्यात प्रियकरानेच अश्लील व्हिडीओ काढून गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केलं, मित्रांसोबतही नको ते करायला लावलं

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget