एक्स्प्लोर

धक्कादायक! लैंगिक संबंधांना नकार दिल्याने मुलीला विष पाजले, उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू

Crime News : या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Crime News : एका 19 वर्षीय मुलीला तिच्या वर्गमित्रांनी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विष देऊन ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जयपुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु झाला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित मुलीच्या वडिलांनी हलेना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचे पाच वर्गमित्र तिला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते आणि तिने यास नकार दिल्याने त्यांनी तिला विष पाजले.

या संदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हलेनाचे एसएचओ विजय सिंह यांनी सांगितले की, बुधवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 328 (विषाने दुखापत करणे) आणि 341 (चुकीच्या संयमाची शिक्षा) अंतर्गत सदर युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडितेच्या व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या तक्रारीत, पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मंगळवारी हलेना शहरात आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या त्यांच्या मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितले की, महाविद्यालयातील काही विद्यार्थी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. तिला त्रास देत आहेत.’

तक्रारीनुसार, ही मुले पीडितेवर अपमानास्पद शेरेबाजी करत असत. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 3च्या सुमारास, ती घरी परतत असताना या युवकांनी तिचा पाठलाग केला आणि तिला जबरदस्तीने काहीतरी द्रव प्यायला लावले. घरी पोहोचल्यावर तिला उलट्या होऊ लागल्या. या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agarwal Siya Goyal Lohagad Case Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, कोर्टात नेमकं काय काय घडलं?
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Akola : अखेर 'त्या' लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात छापमारे, ACB हाती लागलं मोठं घबाड  
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget