एक्स्प्लोर

EPFO :  नोकरी सोडल्यानंतर Date of Exit ची चुकीची नोंद कशी दुरुस्त करायची? ईपीएफओ पोर्टलवर रेकॉर्ड अपडेट कसं करायचं?  

EPFO : एखाद्या कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यात Date of Exit नोंदवावी लागते. ती नोंदवताना चूक झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. 

EPFO नवी दिल्ली : नोकरी सोडताना कागदोपत्री अनेक गोष्टींची पर्तता करावी लागते. एखाद्या छोट्या चुकीकडे दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. एखाद्या कंपनीमधील नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यात नोकरी सोडल्याची तारीख नोंदवायची असते. ती तारीख नोंदवताना चूक झाल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तु्ही नव्या कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर पीएफ खात्यातील रक्कम नव्या पीएफ खात्यात वर्ग करताना समस्या येऊ शकतात. त्यामुळं पीएफ खात्यातील चुकीची डेट ऑफ एक्झिट कशी दुरुस्त करायची हे जाणून घेणार आहोत. 

पीएफ खात्यातील चुकीची डेट ऑफ एक्झिट तुमच्या नोकरीच्या कागदपत्रांमधील विसंगती दाखवून देते. कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या पडताळणीवेळी समस्या निर्माण होऊ शकतात. 

पीएफ खातेदार दुरुस्ती करु शकतात

पीएफ खातेदार आता त्यांची डेट ऑफ एक्झिट दुरुस्त करु शकतात. यासाठी जुन्या कंपनीला संपर्क करण्याची गरज राहिलेली नाही. ईपीएफओनं खातेदारांना त्यांची यूएएन लिंक्ड खात्याद्वारे डेट ऑफ एक्झिट दुरुस्त करण्याची परवानगी दिलेली आहे. चुकीची डेट ऑफ एक्झिट दुरुस्त करण्यापूर्वी ती दुरुस्ती करण्यास पीएफ खातेदार पात्र आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे. 

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार ईपीएफओ खातेदार त्यांची डेट ऑफ एक्झिटची तारीख नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर नोंदवू शकतात. ती तारीख कंपनीनं पीएफ शेवटचा पीएफ जमा केलेल्या तारखेच्या अगोदरची असून नये. पीएफ खातेदाराचं यूएएन खातं सक्रीय असलं पाहिजे. ते आधार क्रमांकासोबत लिंक देखील असावं. आधार लिंक्ड मोबाईल नंबर सक्रिय असावा. जो ओटीपीआधारित पडताळणीसाठी आवश्यक असेल. 

तुम्ही जर डेट ऑफ एक्झिट नोंदवण्यास किंवा अपडेट करण्यास पात्र असाल तर ऑनलाइन पद्धतीनं ईपीएफओ मेंबर अकाऊंटद्वारे ते करु शकता.  यासाठी प्रथम  ईपीएफओ मेंबर पोर्टलवर यूएएन क्रमांक आणि पासवर्ड द्वारे लॉगीन करावं लागेल. यानंतर मॅनेज पर्यायवर क्लिक करावं तिथं मार्क एक्झिट हा ऑप्शन निवडावा.

नवी डेट ऑफ एक्झिट नोंदवण्यापर्वी तुमची सर्व्हिस हिस्ट्री चेक करावी. तिथं तुमच्या अगोदरच्या कंपनीनं टेट ऑफ एक्झिट नोंदवलीय का ते पाहावं. ती नोंद बरोबर आहे की चूक आहे हे तपासून घ्यावं.  जर नोंद चुकीची असेल तर तुमच्याकडील कागदपत्रांची तपासणी करुन योग्य तारीख नोंदवावी. त्यासाठी रिलीव्हिंग लेटर, सॅलरी स्लीप आणि कागदपत्रांची तपासणी करावी. 

तुम्ही योग्य डेट ऑफ एक्झिट नोंदवल्यानंतर, नोकरी सोडण्याचं योग्य कारण निवडावं.  यानंतर तुम्हाला आधार आधारीत ओटीपी पडताळणी करावी लागेल. आधार पडताळणी झाल्यानंतर तुमची विनंती स्वीकारली जाईल. 

दरम्यान, चुकीची डेट ऑफ एक्झिट तुम्हाला दुरुस्त न करता आल्यास ज्या कंपनीत काम करत होता तिथं संपर्क करुन त्यांना रेकॉर्ड दुरुस्त करायला सांगावे. त्या कंपनीकडून दुरुस्ती केली जात नसेल तर ईपीएफओकडे संपर्क करावा. तुम्हाला जेव्हा चूक लक्षात येईल तेव्हा ती दुरुस्त करुन घ्यावी.

पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करायचा असतो तेव्हा डेट ऑफ एक्झिट नोंदवलेली असणं आवश्यक असतं. डेट ऑफ एक्झिट नोंदवलेली नसणं किंवा चुकीच असल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget