Wipro Share Price : बीएसईवर (BSE) शुक्रवारी इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये विप्रोचा (Wipro) शेअर 3 टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. बाजारातील पडझडीनंतर विप्रोचा शेअर 484 रुपयांवर पोहोचला. तज्ज्ञांच्या मते, कंपनीनं मार्च तिमाहीत (Q4FY22) निराशाजनक कामगिरी नोंदवली आहे. हे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर दरात सात टक्क्यांची घसरण झाली आहे. 


देशातील आयटी (IT) क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या विप्रोचा स्टॉक 4 मे 2021 रोजी 477.80 च्या निच्चांकी स्तरावर जाऊन पुन्हा काहीसा वधारला होता. गेल्या एका महिन्यात सेन्सेक्समध्ये 7.7 टक्क्यांची घसरण झाली होती. तर याच्या तुलनेत आता  विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये अधिक घसरण झाली. कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 18 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


वर्षभराचा लेखा-जोगा 


वर्षभराच्या लेख्याजोग्यानुसार, विप्रोचा नफा वार्षिक आधारावर 3.85 टक्के आणि तिमाही आधारावर 4 टक्क्यांनी वाढून Q4FY22 मध्ये 3,087 कोटी रुपये झाला होता. वार्षिक आधारावर Q4FY22 मध्ये कंपनीचं उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 16,245 कोटी रुपयांवरून 28 टक्क्यांनी वाढून 20,860 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. 


IT सेवांमधून कंपनीचं उत्पन्न तिमाही आधारावर 3 टक्क्यांनी वाढून 2.72 अब्ज डॉलर झालं आहे. तसेच, त्याची EBIT तिमाही आधारावर 17 टक्के राहिली. निकालानंतर, विप्रोनं म्हटलं आहे की, बाजारातील सौद्यांमध्ये संरचनात्मक बदल झाला आहे. आता ग्राहक मोठ्या सौद्यांना मध्यम सौद्यांमध्ये मोडत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :