Reliance Industries : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही कंपनी 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 22.5 टक्के एकत्रित निव्वळ नफा 16,203 कोटी रुपये कमावला आहे. याआधी अलिकडेच रिलायन्सने बाजार भांडवलात 19 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत रिलायन्सला मिळालेले हे दुसरे मोठं यश आहे.
रिलायन्सच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. 2021-22 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजला 20 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 22.5 टक्के एकत्रित निव्वळ नफा 16,203 कोटी रुपये कमावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की, तेल शुद्धीकरण मार्जिन, दूरसंचार आणि डिजिटल सेवांमध्ये सातत्याने झालेली वाढ आणि किरकोळ व्यवसायातील चांगली गती यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.
तेल ते दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला 2020-21 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत 13,227 कोटी रुपयांचा एकुण निव्वळ नफा झाला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा झालेला निव्वळ नफा 60,705 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच रिलायन्सच्या उत्पनांतही मोठी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न वाढून 7.92 लाख कोटी रुपये (102 अब्ज डॉलर) झाले आहे. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही वार्षिक 100 अब्ज डॉलर उत्पन्न मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Reliance Industries: रिलायन्सची ऐतिहासिक झेप, 'अशी' कामगिरी करणारी पहिली भारतीय कंपनी
- आयडीबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेची लवकरच विक्री होण्याची शक्यता
- झोमॅटोच्या दीपिंदर गोयलांचे मोठे पाऊल ; डिलिव्हरी पार्टनरच्या मुलांच्या शिक्षणासाठी 700 कोटींची देणगी
- Sri Lanka Emergency : श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची घोषणा