Cola King : कोण आहेत कोला किंग, ज्यांनी कमावले एकाच वर्षात 49 हजार कोटींची संपत्ती
Cola King Ravi Jaipuria: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी जयपुरिया यांनी 2023 मध्ये 49 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांनी कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे बँकर उदय कोटक यांनाही मागे टाकले आहे.
![Cola King : कोण आहेत कोला किंग, ज्यांनी कमावले एकाच वर्षात 49 हजार कोटींची संपत्ती who is cola king ravi jaipuria who earn 49 thousand crore property in 2023 india business maharshtra marathi news Cola King : कोण आहेत कोला किंग, ज्यांनी कमावले एकाच वर्षात 49 हजार कोटींची संपत्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/24/998f0fa64f7c86007aac44154664714f170341515264093_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Varun Beverages : कोला किंग अशी ओळख असलेले देशातील प्रसिद्ध उद्योगपतील रवी जयपुरिया (Ravi Jaipuria) यांच्यासाठी 2023 हे वर्ष अंत्यंत भरभराटीचं गेल्याचं दिसून आलं. त्यांनी कमाईच्या बाबतीत त्यांनी उदय कोटक यांनाही मागे टाकले आहे. RJ कॉर्पचे संस्थापक आणि चेअरमन रविकांत जयपुरिया यांच्या संपत्तीमध्ये 2023 मध्ये 6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्याच्या कमाईत सर्वात मोठा वाटा वरुण बेव्हरेजेसचा होता. कंपनीने 2016 मध्ये आपला IPO आणला आणि तेव्हापासून तिचे शेअर्स 18 पट वाढले आहेत.
कोला किंग अशी ओळख असलेल्या रवी जयपुरिया यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांना मागे टाकले आहे. FMCG क्षेत्रात कार्यरत वरुण बेव्हरेजेसचे मार्केट कॅप या कालावधीत 163418.38 कोटी रुपये झाले आहे. तर जर त्यांची एकूण संपत्ती 15.1 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
कोण आहेत रवी जयपुरिया? (Who Is Cola king Ravi jaipuria)
रवी जयपुरिया मारवाडी व्यापारी आहेत. त्यांनी अमेरिकेतून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. 1985 मध्ये ते भारतात परतले आणि कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. रवी जयपूरिया यांच्या कुटुंबात 1987 मध्ये फूट पडली. त्यानंतर त्यांनी बॉटलिंग प्लांट घेतला आणि पेप्सिकोशी करार केला. त्यांनी दोन्ही कंपन्यांची नावे त्यांच्या मुला आणि मुलीच्या नावावर ठेवली आहेत.
पेप्सिकोचा दुसरा सर्वात मोठा बॉटलिंग पार्टनर
वरुण बेव्हरेजेस व्यतिरिक्त देवयानी इंटरनॅशनलचा (Devyani International) देखील आरजे कॉर्पमध्ये समावेश आहे. त्यांची कंपनी वरुण बेव्हरेजेस पेप्सिकोसाठी उत्पादन, बाटलीबंद आणि वितरणाचे काम करते. हे पेप्सिकोचे अमेरिकेबाहेरील दुसरे सर्वात मोठे बॉटलिंग भागीदार आहेत. त्याच वेळी देवयानी इंटरनॅशनल भारतात KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी आणि TWG चहाचे आउटलेट चालवते.
मेंडाटा आणि लेमन ट्री मध्ये भागीदार
रवी जयपूरिया यांची हेल्थकेअर फर्म मेदांता आणि हॉटेल चेन लेमन ट्रीमध्येही भागीदारी आहे. मार्च 2023 पर्यंत, RJ कॉर्प लिमिटेडकडे 7 स्टॉक होते, ज्यांची एकूण संपत्ती अंदाजे 37,334.1 कोटी रुपये होती.
वाढत जाणारा व्यवसाय
रवी जयपुरिया आपला व्यवसाय भारताबाहेर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांच्या कंपनीने दोन मोठे आंतरराष्ट्रीय करारही केले आहेत. वरुण बेव्हरेजेसने द बेव्हरेज कंपनीचे अधिग्रहण करून दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हा करार 1,320 कोटी रुपयांना केला आहे. याशिवाय देवयानी इंटरनॅशनल थायलंडमधील व्यापारतही उतरणार आहे. कंपनीने रेस्टॉरंट्स डेव्हलपमेंट कंपनीमधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करार केला आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)