मुंबई : सध्या देशात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) होत आहे. येत्या चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकालानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार येण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे होणारा संभाव्य तोटा टाळायचा असेल तर लार्ज कॅप शेअर्स खरेदी करायला हवेत, असा सल्ला अनेकजण देतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा सत्तेत आल्यास बाजारात (Share Market) मोठी तेजी पाहायला मिळेल, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. तर चार जूनच्या निकालाची वाट पाहण्याचाही सल्ला अनेकजण देत आहे. याच पार्श्वभूमीवर सेबी सेबी रजिस्टर्ड् रिसर्च अॅनालिस्ट विकास बगडिया यांनी पीएसयू सेक्टर, इन्फ्रा सेक्टर, वॉटर इन्फ्रा, रेल्वे, मेटल अँड मायनिंग सेक्टरवर लक्ष ठेवले पाहिजे असा सल्ला दिला आहे.
ONGC चे शेअर्स करणार मालामाल
विकास बगडिया यांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या कंपनीचे शेअर्स खरेदी करता येतील. या कंपनीचा शेअर 255 ते 279 रुपयांदरम्यान असल्यावर तो विकत घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार या कंपनीचा शेअर लवकरच 450 पर्यंत पोहोचू शकतो. हा शेअर खरेदी करताना 210 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा असा सल्लाही बगडिया यांनी दिला आहे.
ओनजीसी कंपनी नेमकं काय करते?
सेबी रजिस्टर्ड रिसर्ज अॅनालिस्ट विकास बगडिया यांच्या मतानुसार ओनजीसी ही देशातील सर्वांत मोठी क्रूड आणि नॅचरल गॅसची निर्मिती करणारी कंपनी आहे. बगडिया यांच्या मतानुसार या कंपनीच्या मंथली चार्टवर स्ट्राँग ब्रेकआउट आहे. एमएसीडी आणि आरएसआय यासारखे टेक्निकल इंडिकेटर्ससुद्धा ओनजीसीचे शेअर्स हे स्टाँग बुलिश ट्रेंडवर असल्याचे संकेत देत आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पैसे बुडण्याची भीती नाही, दमदार रिटर्न्स मिळणार; जाणून घ्या सरकारच्या 'या' चार भन्नाट योजना!
शेअर बाजारावर 'हे' सात पेनी स्टॉक्स सुस्साट धावणार, मिळू शकतो दमदार परतावा!
निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? नरेंद्र मोदींचं मोठं भाकित; म्हणाले 4 जूननंतर...