Courses after 12th Class Fail : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (HSC Result 2024) जाहीर केला आहे. यावर्षी बारावीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. एकूण नऊ विभागीय मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी देखील मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. दरम्यान, जी मुलं 12 वी नापास झाली आहेत त्यांनी नेमकं काय करावं? तर नापास झालेल्या मुलांनी टेन्शन घेऊ नये, त्या मुलांसाठी विविध कोर्सेस सुरु आहे. हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला निश्चित नोकरी मिळेल. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


अपयशाने खचून न जाता प्रयत्न करणे गरजेचे 


बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका. कारण, अपयश ही यशाची पहिली पायरी अस म्हटलं जातं. त्यातूनच आपण काय काय तरी शिकतो. अपयशातूनच आपल्याला यशाचा मार्ग मिळतो. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अपयश येतेच. मात्र, अपयशाने कुठेही खचून न जाता प्रयत्न करणे गरजेचे आहे. बारावी नापास झाल्यावर अनेक कोर्स उपलब्ध आहेत. हे कोर्स खूप कमी वेळेचे आहे. काही तीन वर्षांच्या डिप्लोमाचे कोर्सेस पण आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेऊन तुम्ही चांगले करियर करु शकता.  


12 वी नापास झाल्यानंतर हे कोर्स करु शकता?


अ‍ॅनिमेशन मधील डिप्लोमा कोर्सेस
डिझाइन मधील डिप्लोमा कोर्सेस
इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेस 
आयटीआय डिप्लोमा कोर्सेस
कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेस 


आयटीआय डिप्लोमा कोर्सेस 


1) अ‍ॅनिमेशन डिप्लोमा 


अ‍ॅनिमेशनच्या सतत वाढत्या वापरामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांची मोठी मागणी केली जात आहे. अ‍ॅनिमेशन कोर्स करिअरची हमी म्हणून पाहिला जात आहे. चित्रपट, खेळ आणि जाहिराती यासारख्या क्षेत्रात अ‍ॅनिमेशनचा बराच वापर केला जातो. अ‍ॅनिमेशनच्या अनेक डिप्लोमा कोर्समध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण प्रवेश घेऊ शकता. अ‍ॅनिमेशन डिप्लोमा कोर्स हा करीयरचा उत्तम मार्ग आहे, 


2) डिझाइन डिप्लोमा कोर्सेस 


डिझाइन डिप्लोमा कोर्से हा देखील करीयरचा उत्तम मार्ग आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही डिझाईनच्या कोणत्याही पदवीच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. जर तुम्हाला डिझाईन क्षेत्रात रस असेल तर. डिझाईनमध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग इत्यादी क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करू शकता. 


3) कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सेस 


12 वी मध्ये नापास झाल्यानंतर तुम्हाला कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेसला प्रवेश घेता येईल. डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर आपण कॉम्पुटर डिप्लोमा कोर्स करू शकता. ज्यामध्ये तुम्ही कॉम्पुटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, मोबाईल, एचटीएमएल, व्हिडीओ एडिटिंग, ड्रीमव्ह्यूव्हर आणि कॉम्प्यूटर या अँप्लिकेशन विषयांचा अभ्यास शकू शकता.


4) इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्से


दहावी उत्तीर्ण मार्कशीटच्या आधारे आपण इंजीनियरिंगच्या डिप्लोमा कोर्स करू शकतो. दहावी पासून इंजीनियरिंगच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. या डिप्लोमा कोर्समुळे तुम्हाला खासगी कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळू शकते. मॅकेनिकल इंजीनियरिंग , इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, संगणक इंजीनियरिंग, माहिती तंत्रज्ञान इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग इत्यादी इंजीनियरिंगच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता.


आयटीआय डिप्लोमा कोर्सेस


तुम्ही 12 वी च्या परीक्षेत नापास झाला असेल तर नाराज होण्याचे कारण नाही. कारण नापास झाला असला तर तांत्रिक क्षेत्रात करियर बनवता येईल. त्यासाठी आयटीआय डिप्लोमा कोर्स करणे तुम्हीच्यासाठी उत्तम पर्याय आहे. भारत सरकारने प्रत्येक शहरात आणि गावात आयटीआय केंद्रे उघडली आहेत. तुम्ही 6 वर्षांचा किंवा 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्यात तुम्हाला सरकारी क्षेत्रात बर्‍याच रोजगार मिळू शकतात.


आज 12 वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये कोकण विभाग अग्रभागी राहिला आहे. जाणून घेऊयात विभायनिहाय निकालाची माहिती. निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.


विभागनिहाय निकाल


कोकण : 91.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के


कुठे पाहता येणार निकाल?              



महत्वाच्या बातम्या:


HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI