मुंबई : भारतात जेव्हा कधी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला जातो, तेव्हा सर्वांत अगोदर फिक्स डिपॉझिचा विचार केला जातो. आजही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र या फिक्स डिपॉझिटपेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवेलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो. याच पार्श्वभूमीवर आपण भारत सरकारच्या अशा चार योजना जाणून घेऊ या, ज्या सुरक्षित तर आहेतच पण गुंतवलेल्या पैशांवर नफादेखील चांगला देतात.


पोस्ट ऑफिस सेविंग्स स्कीम


यातील पहिल्या क्रमांकाची योजना आहे पोस्ट  ऑफिस सेव्हिंग स्किम. या योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये जमा करून तुमचे खाते खोलता येऊ शखते. आर्थिक वर्षे संपेपर्यंत तुम्ही या खात्यात 500 रुपयांपर्यंत रक्कम वाढवली नाही, तर पोस्ट ऑफिसतर्फे मेन्टेनन्स चार्जेच्या रुपात 50 रुपये कापले जातात. तुमच्या या खात्यातील जमा रक्कम जेव्हा शून्य होते, तेव्हा हे खाते आपोआप बंद होते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवलेल्या रकमेवर वर्षाला 4 टक्के रिटर्न्स मिळतात. इतर शासकीय योजनांच्या तुलनेत हे रिटर्न्स सर्वाधिक कमी आहेत.


नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट 


या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती किमान 1000 रुपये आणि 100 रुपयांच्या पटीत पैसे जमा करून आपले खाते खोलू शकतो. या योजनेत गुंतवणुकीची कोणीतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही पैसे किती काळासाठी जमा केले आहेत, त्यानुसार तुम्हाला व्याज मिळते. एका वर्षासाठी जमा केलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना 6.9 टक्के, दोन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7 टक्के, तीन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.1 टक्के आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळते. 


शेतकरी विकास पत्र योजना


कमीत कमी 1,000 आणि 100 च्या पटीत गुंतवणूक करून तुम्ही या योजनेसाठी आपले खाते खोलू शकता. या योजनेतही जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत जमा केलेल्या पैशांवर वर्षाला 7.5 टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळते. विशेष म्हणजे तुम्ही या योजनेत एकदा गुंतवलेले पैसे हे 9 वर्षे 7 महिन्यांत थेट दुप्पट होते. 


सुकन्या समृद्धी योजना


कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करून सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत जमा केलेल्या पैशांवर तब्बल 8.2 टक्क्यांनी व्याज दिले जाते.  


हेही वाचा :


पाच हजारांचे ईएमआय प्रकरण, आता द्यावा लागणार 20 पट दंड; 'या' बँकेला मोठा फटका!


निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात काय होणार? नरेंद्र मोदींचं मोठं भाकित; म्हणाले 4 जूननंतर...


सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?