मुंबई : सध्या देशात लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. दरम्यान ही निवडणूक चालू असताना भारतीय शेअर बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी बाजार आपटतोय तर कधी याच बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर तेजीत असल्याचे पाहायला मिळतेय. दरम्यान, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा भारतीय शेअर बाजारावर (Share Market) भाष्य करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना खुश करणारे भाकित वर्तवले आहे.  


नरेंद्र मोदी काय म्हणाले?


नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शेअर बाजारावर भाष्य केलंय. ज्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, त्या कंपन्यांचे शेअर्स एकदा पाहा. त्या शेअर्सचे रेकॉर्ड तपासून पाहा. गेल्या एका वर्षात सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. ज्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स नेहमी पडायचे आता ते तेजीत पाहायला मिळतात. एचएएल या शासकीय कंपनीला 4 हजार कोटी रुपयांचा नफा झालेला आहे. असं याआधी कधीही घडलं नव्हतं. याच कंपनीसाठी कधीकाळी विरोधक रस्त्यावर उतरायचे. ही कंपनी लवकरच बुडणार आहे, असे लोक म्हणायचे. अशाच प्रकारे रेल्वेच्याही एका शेअरने तेजीत रेकॉर्ड केला आहे, असे मोदी म्हणाले. भारताच्या डिजिटल क्रांतीची सध्या जगभरात चर्चा आहे, असे मोदी म्हणाले. 


कृत्रिम बुद्धीमत्तेवरही मोदींचे भाष्य


नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत कृत्रिम बुद्धीमत्तेवरही भाष्य केलं. भारत कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल. भारताकडे खूप सारा डेटा आहे. एवढा सारा डेटा जगात कोणाकडेही नाही. भारताकडे युवकांचे प्रमाणही जास्त आहे. भारतात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढतोय. फूड प्रोसेसिंगपासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत कृत्रिम बुद्धीमत्तेचे प्रमाण वाढत आहे. एआयची प्रगती ही भारतासाठी अनेक अर्थांनी चांगली आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे मोदी म्हणाले. 


सरकारी कंपन्यांची सध्याची स्थिती काय?


दरम्यान, गेल्या काही काळात फक्त एचएएल नव्हे तर अनेक शासकीय कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. IEC असे किंवा रेल्वे विकास प्राधिकरण,  एमएमटीसी असे किंवा खाणकामातील एनएमडीसी ही कंपनी असो, या सर्वच कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. बँकिंग सेक्टरमध्येही सरकारी बँक एसबीय, सेन्ट्रल बँक, यूको बँक या बँकांनीही गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. इरकॉन, एनएचपीसी यांच्यासह एकूण 56 सरकारी कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी चांगली राहिलेली आहे. 


हेही वाचा :


एका आठवड्यात 'हे' पाच पेनी स्टॉक ठरले रॉकेट, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!


सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?


बापरे! एका रात्रीत शेतकरी झाला अब्जाधीश, खात्यावर आले तब्बल 99 अब्ज 99 कोटी 94 लाख रुपये