Buddha Purnima 2024 : वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते, या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला. या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीचं ग्रहमान विशेष असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी शनीची स्थिती काही राशींना धनवान बनवू शकते. बुद्ध पौर्णिमेच्या (Buddha Purnima 2024) दिवशी बऱ्याच वर्षांनी शनि स्वराशीत, म्हणजेच कुंभ राशीत आहे. या दिवशी धन योगाची निर्मिती देखील होत आहे, ज्याचा विशेष फायदा 4 राशींच्या लोकांना होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? पाहूया.


बुद्ध पौर्णिमेला 'या' राशींवर धनाची बरसात


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना या दिवशी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुमच्या मिळकतीत वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. पूर्वी झालेल्या खर्चातील वाढ आता आटोक्यात येऊ शकतो. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहील. तुम्हाला व्यवसायात मोठी डील मिळू शकते किंवा तुमच्या काही योजना यशस्वी होऊ शकतात. 


वृषभ रास (Taurus)


बुद्ध पौर्णिमेपासून वृषभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रमोशनचे योग आहेत, तुम्ही तुमच्या आवडीची पोस्ट मिळवू शकता. गुंतवणुकीतून विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या भरपूर संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत तुमची प्रगती होईल. खासगी जीवनाशी संबंधित कामं पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.


तूळ रास (Libra) 


बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धन योग बनल्याने तूळ राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उच्च पद मिळू शकतं. घरात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. मंगलकार्यात सहभागी होता येईल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांवर शनिची कृपा राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. गुंतवणूक केल्यास त्यात तुम्हाला नफा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Buddha Purnima 2024 : यंदाची बुद्ध पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि उपासनेची पद्धत


Venus And Sun Yuti : तब्बल 5 वर्षानंतर शुक्र आणि सूर्याची युती; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ