मुंबई : भविष्यात कोणतेही आर्थिक संकट येऊ नये म्हणून विमा हा उत्तम पर्या आहे. आरोग्य विमा, जीवन विमा, अपघात विमा अशा वेगवेगळ्या प्रकारचे विमे काढून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. पण अनेकवेळा आपण प्रत्यक्ष अडचणीत सापडल्यांतर जेव्हा विमा कंपन्यांकडे आपला विमा क्लेम करायला जातो, तेव्हा आपल्या हाती निराशाच येते. विमा कंपन्या अनेकवेळा लोकांचे क्लेम रिजेक्ट करतात. अशा वेळी विमाधारकापुढे निराशेशिवाय दुसरे काहीही नसते. अशा वेळी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ठिकाणी तुम्ही तक्रार दिल्यावर किंवा योग्य ठिकाणी अधिक चौकशी केल्यावर तुम्हाला विम्यावरील क्लेम (Insurance Claim) मिळू शकतो.  


भविष्यकालीन सुरक्षिततेसाठी विमा काढणाऱ्या लोकांना ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अनेक नियम घातलेले आहेत. या नियमांच्या अधीन राहूनच विमा कंपन्यांना लोकंचा विमा काढावा लागतो आणि क्लेम केलेल्या विम्यांना मंजुरी द्यावी लागते.


विम्याचे क्लेम नाकारले का जातात? 


वेगवेगळी कारणं समोर करून विमा कंपन्या क्लेम नाकारतात. याची काही कारणं आहेत. पॉलिसी घेताना किंवा क्लेम करताना पॉलिसी होल्डर्स योग्य माहिती देत नाहीत. पॉलिसींच्या अटी नाकारल्यावरदेखील कंपन्या क्लेम नाकारतात. विमा क्लेम करताना विमाधारकांनी संपूर्ण कागदपत्रे कंपन्यांना देणे अपेक्षित असते. पण तसे न झाल्यामुळे कंपन्या क्लेम नाकारतात. मात्र विमा धारकांनी येथेच थांबू नये. कारण विमा घेण्याचे अन्य पर्यायही आहेत. 


क्लेम नाकारल्यावर काय करावे? 


एखाद्या कंपन्यांनी तुमचा क्लेम नाकारल्यास घाबरून जाऊ नये. अशा वेळी विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडे क्लेम नाकारला गेल्याची तक्रार करावी. अनेकवेळा योग्य माहिती न दिल्यामुळेही क्लेम नाकारला जातो.अशा स्थितीत तक्रार निवारण अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर क्लेम स्वीकारला जाऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे IRDAI कडे जाऊनही क्लेम नाकारण्यात आल्याची तक्रार करताय येते.


मेल किंवा कॉल करूनही तक्रार करता येते


विमा कंपनीकडे तक्रार करूनही क्लेम स्वीकारला जात नसेल तर थेट IRDAI कडे तक्रार करता येते. Complaints@irdai.gov.in या ई-मेलवरही IRDAI कडे थेट तक्रार करता येते. यासह 1800 4254 732 किंवा 155255  टोल फ्री क्रमांकांवरही कॉल करून तुम्हाला तुमची तक्रार दाखल करता येते. 


हेही वाचा :


करप्रणालीत बदल कसा करावा? नव्या वर्षात हे शक्य आहे का? जाणून घ्या सविस्तर


SIP करताय पण चौपट, पाचपट परतावा हवाय? मग 'या' सूत्राचा अवलंब करा अन् खोऱ्याने पैसे ओढा!


आलिशान बंगला, महागडी कार, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आहे कोट्यवधीची मालकीण, एकूण संपत्ती किती?